dark_mode
Image
  • Sunday, 22 December 2024
युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे (Yuva Karya Prashikshan Yojana Maharashtra 2024)

युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे (Yuva Karya Prashikshan Yojana Maharashtra 2024)

युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे (Yuva Karya Prashikshan Yojana Maharashtra 2024)

बेरोजगार आहात मग हि बातमी नक्की वाचा
युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे.

काय आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना मराठी 

महाराष्ट्र सरकारने सन २०२४ साली हि योजना चालू केली आहे ,
महाराष्ट्रातील गरीब व होतकरू तरुणांसाठी हि योजना आहे .
या योजनेसाठी १२ वी पास युवा अर्ज करू शकतात .
या मध्ये तुम्हाला सरकार कडून एक शाळा /कॉलेज /कंपनी किंवा कोणताही व्यवसायिक ठिकाण
निवडून दिले जाईल व त्याची संपूर्ण माहिती पुरवली जाईल.
हा संपूर्ण कालावधी ६ महिने इतका असेल या मध्ये तुम्ही ज्या पण क्षेत्रात जातात त्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
खालील प्रमाणे संपूर्ण माहिती वाचून तुमचा फॉर्म भरा.

 

उशदष्ट :- उमेदवारांना उद्योजकांकडेप्रत्यक्ष कायय प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.


आर्थिक तरतुद :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करीता रु.5500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप:- उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारेमनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
अंमलबजावणी संस्था :- कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य

योजनेचे ठळक वैशिष्टे :-
बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील.


विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग / स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील.


सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
• सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
• सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
आस्थापना/ उद्योजकासाठी पात्रता
• आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
• आस्थापना
उद्योजका कौशल्य, रोजगार,
उद्योजकता
https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
• आस्थापना/ उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
व नाविन्यता विभागाच्या
• आस्थापना / उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली
असावी.


युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवारांची पात्रताः

उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
• उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
• उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
• उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
• उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
•उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

युवा कार्य प्रशिक्षण योजना शैक्षणिक विद्या वेतन खालील प्रमाणे असेल
१२ वी पास ६००० रुपये प्रति महिना
आय टी आय / पदविका ८००० प्रति महिना
पदवीधर /पदव्युत्तर १०००० रुपये प्रति महिना

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्य पद्धत व मार्गदर्शन सूचना येथे पहा
https://rojgar-assets.s3.ap-south-1.amazonaws.com/CMYKPY_FAQ_v1.0.pdf

युवा फॉर्म भरण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration

comment / reply_from