लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा ? ( ladki bahin yojana Marathi Araj Hamipatra )
लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा ? ( Ladki Bahin Yojana 2024 )
योजनेचे उदिदष्ट :
१. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
२. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
३. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
४. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
५. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
योजनेचे स्वरुप :
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT
द्वारे दरमहा रु.१५००/- इतकी रक्कम दिली जाईल.
योजनेचे लाभार्थी :
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
पात्रता:
१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत. ४. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
सर्व प्रथम खालील कागदपत्रे आहेत का ते तपासा
आवश्यक कागदपत्रे : (ladki bahin yojana 2024 )
१. आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)
२. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड /१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक. ४. वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक,
(अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
५. नवविवाहितेच्या बाबतीत रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
६. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)
७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो.
कधीपर्यंत असेल कालावधी उद्दिष्ट्य :-
• २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना लाभ.
• योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट, २०२४.
• महिलांना १,५०० रुपये प्रति महिना ;
म्हणजेच दरवर्षी १८,००० रुपये मिळणार.
• वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक,
• पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,
• शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
• विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ.
• योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र / १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार.
• इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र/१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार.
तारीख मुदत दिली वाढून ( ladaki bahin yojana last date)
महाराष्ट्रातील भरपूर महिलांचे अर्ज काही कागदपत्रांमुळे भरायचे राहिले आहेत त्या मुळे
३१ ऑगस्ट ऐवजी ३० सप्टेंबर हि तारीख दिली आहे .
तरी सुद्धा तुमच्या फॉर्म अर्ज हा १५ सप्टेंबर आधी भरा म्हणजे तुम्हाला चालू हप्ता भेटण्याची शक्यता आहे .
सप्टेंबर मध्ये भरलेल्या अर्जांना पहिले दोन हफ्ते मुकावे लागू शकतात.
योजनेचे अर्ज - महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल / मोबाईल ॲपद्वारे/ सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
संकेस्थळ द्वारे अर्ज भरा
अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळ वापरून अर्ज भरू शकता
https://ladakibahin.maharashtra.gov.in/scheme-register
मोबाईल ॲपद्वारे अर्ज भरा नरी शक्ती ॲपद्वारे अर्ज भरा (Narishakti Doot App Download)
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून नरी शक्ती अँप डाउनलोड करून अर्ज भरू शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हमीपत्र डाउनलोड करा लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1Xj-9iSLohREPMiwlKjBl7ILk-b80I4BW/view?usp=drive_link
खालील गोष्टी लक्षात असुद्या :-
सर्व कागदपत्रे पडताळून पहा सर्व कागदपत्रांवर नावे सारखी असावीत .
फोटो व्यवस्थित अपलोड करा.
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा .
बँक खात्याला आधार कार्ड नंबर लिंक असावा .
माहिती सर्व आधार कार्ड प्रमाणे भरा.
फॉर्म घेतला नाही तर पुन्हा प्रेयत्न करा किंवा काही दिवसानंतर भरा .
फॉर्म रिजेक्ट झाला तर खात्री करा कि भरलेली माहिती बरोबर आहे का .
फॉर्म भरल्या नंतर २४ तासात तुम्हाला एस एम एस येईल .
सुरवातीला तुमचे Status Pending असेल ३ ते ४ दिवसात ते उपडेट होईल .
फॉर्म भरल्यानंतर पडताळणी होई पर्यंत वाट पाहावी काही काळानंतर तुम्हाला एस एम एस द्वारे कळवले जाईल
पुन्हा पुन्हा फॉर्म भरू नका जो पर्यंत आधीच्या फॉर्म ची माहिती मिळत नाही .
फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण भरलेली माहिती तुमच्या डॅशबोर्ड वरती उपलब्ध असते तिथेच तुम्ही तुमच्या अर्जाची स्तिथी पाहू शकता .