dark_mode
Image
  • Sunday, 22 December 2024

घरी चालू करा हा शेतीसोबत व्यवसाय महिलांसाठी ही उपयोगी चांगली कमाई करणायची संधी वाचा सविस्तर

घरी चालू करा हा शेतीसोबत व्यवसाय महिलांसाठी ही उपयोगी चांगली कमाई करणायची संधी वाचा सविस्तर

घरी चालू करा हा व्यवसाय महिलांसाठी ही उपयोगी वाचा सविस्तर (Dehydration Fruits and Vegetables Business )
भारताची लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे .त्याच प्रमाणे शेती उत्पादनात ही घट होत चाली आहे .
आज बाजार कित्येक प्रकारच्या भाज्या उपलब्ध आहेत परंतु सर्वच भाज्या ह्या टिकतात असे नाही .
कारण प्रत्यक हंगामात शेतकरी वेग वेगळ्या भाजीपाल्याची शेती करतात
त्या मुळे बाकी दिवसा मध्ये हा भाजीपाला खूप महाग होत चाल्यामुळे ही एक नवीन कल्पना आहे .

काय आहे व्हेजटेबल डीहाड्रेशन ड्रायर (vegetables dehydration in marathi )
जसे की आपण पाहिले भाजीपाल्याची कमतरता आणि वेळेवर त्याची विक्री न झाल्या मुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान
व ग्राहकांना येणारा भाव वाढीचा त्रास याच्या तून मुक्तता ही या व्यवसाया व्दारे होणार आहे.
व्हेजटेबल डीहाड्रेशन म्हणजे भाज्या उन्हात ठेवणे आणि वाळवणे हे डीहाड्रेशन भाज्या बनवण्याचे सर्वात प्राचीन तंत्र आहे.
हेच कारण आहे की आजच्या काळात हे तंत्र अधिक प्रचलित आणि सत्यापित झाले आहे.
अशा काही भाज्या म्हणजे गाजर, मटार, फ्लॉवर, पालक इ. जे ऑफ सीझनमध्ये चांगल्या किमतीत विकले जातात.
व्हेजटेबल डीहाड्रेशन म्हणजे तुम्ही याला भाज्या वळून विक्री करण्याचा व्यवसाय म्हणू शकता.

जवळील बाजाराचा अभ्यास करा (vegetables business in marathi )
भाजीपाला विशिष्ट ऋतूवर आधारित असतो हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.
वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात पण साधारणपणे
पावसाळ्यात वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
बहुतांश भाज्या नाशवंत होत असतात. (शेती सोबत जोडधंदा )
त्यामुळे तुम्हला तुमच्या जवळील मोठे शहर किंवा मेट्रो शहर पालिका अशा ठिकाणी तुम्हाला विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळू शकतो .
तुम्हाला बाजारातील मागणी व बाजारातील तुमचे प्रति स्पर्धी यांचा अभयास करावा लागेल .
म्हणजे हा व्यवसाय किती ठिकाणी आहे .जावळी मॉल किराणा दुकान बाजारातील दुकान याचा संपूर्ण अभ्यास करून हा व्यवसाय चालू करावा .
किती ठिकाणी हिरव्या भाज्या विकल्या जातात कुठे उपलब्ध आहेत कुठे नाहीत .
या व्यवसाया मध्ये सपर्धा कमी आहे तुम्ही हा व्यवसाय तुमच्या गावातील काही महिलांसोबत करू शकता.
या मध्ये तुम्हला भांडवल आणि कामगार खर्च हि कमी येईल .

यासाठी कोणत्या सामग्री लागतात (vegetables dehydration business material )
व्हेजटेबल डीहाड्रेशन साठी बाजारात काही मशनारी आहेत.
ज्या सोलार व लाईट वरती चालतात.
हा व्यवसाय तुम्ही ५० हजार ते १ लाखापर्यंत सुरु करू शकता .
या मशीन द्वारे तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या वाळून त्याची पेकेगिंग करून विक्री साठी ठेऊ शकता.
हि प्रक्रिया काही ठिकाणी आजही घरी करतात जसे कि कांदा अद्रक असेल त्याच पद्धतीने इतर भाजीपाला हि सुकवतात .
परंतु तुम्ही जर व्यवसाय दृष्टिकोनातून पाहत असाल तर तुम्हला या गीष्टींची आवश्यकता आहे .
१) कचा भाजीपाला जो जवळ उपलब्ध होईल त्या प्रमाणे किंमत
२) लाईट ३ फेज व १० बाय १० ची जागा ५ हजार महिना किंवा स्वतः च्या घरी
३) भाज्या स्वच्छ करणायची मशीन ७० ते १ लाख
४) डीहाड्रेशन मशीन सोलर किंवा लाईट चे ३०००० ते ४०००० हजार बाजार किंमत
५) पेकिंग मशीन १००० ते १५००० हजार (२५० ग्राम ५०० ग्राम १ किलो )
६) प्लास्टिक रो पिशवी ६० ते १०० रुपये किलो
७) कागदी बॉक्स तुमच्या पेकिंग नुसार
८) १ ऑपरेटर ३ कामगार
कोणतेही वेजिटेबल भाजीपाला डीहाड्रेशन केला कि तो बाजारात २०० ते ५०० रुपये किलो विकला जाऊ शकतो .

याची विक्री कुठे केली जाऊ शकते
सध्या च्या काळात भरपूर प्रमाणात याचा उपयोग इंस्टंटन फूड जसे कि तुम्ही चिप्स किंवा एखादे सूप पीत असाल तर त्या मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो .
याची विक्री डायरेक्ट ग्राहका सोबत कमी आहे परंतु हि आता वाढत चालली आहे .
भारतातील कोणत्याही हॉटेल किंवा दुकानांमध्ये तुम्ही याची विक्री साठी उपलब्ध करू शकता .
किंवा एखाद्या कंपनीसोबत तुम्ही काम करू शकता .
सर्वात आधी मार्केट तयार करा नंतर तुमचा व्यवसाय चालू करा .
या मध्ये कांदा ,गाजर ,बटाटा ,टमाटो ,अद्रक ,लसूण या सारखी अनेक भाजीपाला
तुम्ही विक्री करू शकता .
या बद्दल अधिक माहिती तुम्ही युट्युब वरून घेऊ शकता .

comment / reply_from