
चहाच्या व्यवसायातून बनला करोडपती? घेतली ९० लाखाची मर्सिडिज,एमबीए चायवाला MBA Chaiwala Marathi Story
चहाच्या व्यवसायातून बनला करोडपती? घेतली ९० लाखाची मर्सिडिज,एमबीए चायवाला
प्रफुल्ल बिल्लौरने २०१७ मध्ये केवळ ८००० रुपयांत एमबीए चायवाला वेंचरची सुरुवात केली होती.
तीन वर्षांच्या स्ट्रगलनंतर तो २०२० मध्ये व्हायरल झाला आणि एका रात्रीत त्याचं आयुष्यचं बदललं
केवळ मेहनतीच्या जोरावर आज त्याचे देशभरात १०० हून अधिक आउटलेट्स आहेत.
आता तो अमेरिकेतही आउटलेट सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रफुल्ल आज कोट्यवधींचा व्यवसाय करतो,
पण त्याचा साधेपणा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याने नुकतीच ९० लाखांची लक्झरी कार मर्सिडिज बेंज जीएलई ३०० डी खरेदी केली आहे.
प्रफुल ने केले संधी चे सोने
प्रफ्फुलने आपल्या यशाबाबत बोलताना सांगितलं, की भारतात संधी मिळत नाहीत हे बोलू शकत नाही,
आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहून काम करायला हवं. भारतात अनेक संधी आहेत, तसंच अनेक गोष्टीही आहेत.
भारतात यशाचा अर्थ पैसे कमावण्यासह तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यही उत्तम राहणं असा आहे
तुम्ही कोणतीही गोष्ट करताना त्याची लाज बाळगू नका. समाजातील सर्व लोकांना तुम्ही कसे यशस्वी होऊ शकता, हे दाखवून द्या.
हे करणे सोडा आणि नवी संकल्पना करा
मजा-मस्ती, गाड्यांमधून फिरणं, मद्यपान करणं, लग्नामध्ये नाचणं...तरुण अशा अनेक गोष्टींमध्ये आपली संपूर्ण ताकद घालवतात,
जिथून कोणतेही रिटर्न्स मिळत नाहीत. यशस्वी होण्यासाठी आपल्याला वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे.
कधी-कधी मोठ्या यशासाठी लहान भांडणं हरावी लागली तरी चालतात असंही तो म्हणाला.
हे हि वाचा :- चहा चा व्यवसाय कसा सुरु करावा वाचा संपूर्ण माहिती
या व्यवसायला हि मिळाला सन्मान
सध्या जितका मान-सन्मान आज नेते, बॉलिवूड स्टार्सला मिळतो, तितका सन्मान,
प्रेम एंटरप्रेन्योर्सला मिळत नाही. एंटरप्रेन्योर्स अशी गोष्ट आहे जिथे भारताची प्रगती दिसते,
असं तो म्हणाला. तसंच यश मिळणं, यशस्वी होणं म्हणजे तुम्ही तुमच्याकडे लक्ष देणं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं,
सर्व टॅक्स भरणं आणि समाजाच्या विकासासाठी मदत करणं हा आहे, असंही आपल्या यशाबाबत बोलताना प्रफुल्लने सांगितलं
