शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी ST ची महाकार्गो पहा काय आहे सेवा ST Mahacargo MSRTC

प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी ही नेहमीच सज्ज असते.
MSRTC ने शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी साठी चालू केलेली हि सेवा सुस्साट चालू आहे .
या मध्ये शेतकरी आपला भाजीपाला व रोजच्या वस्तू किंवा पार्सल या द्वारे पाठवू शकता .
शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना वाहतूक दळणवळण करताना अडचणी येऊ नये
या साठी हि सेवा चालू केल्याचं सांगितल जाते .
या प्रकारची सेवा MSRTC एमएसआरटीसीसाठी उत्पन्नाचा एक चांगला स्रोत देखील आहे.
काय आहे महाकार्गो
हि सेवा महाराष्ट्र साठी चालू केलेली आहे .
या द्वारे शतकारी खते बियाणे शेतमाल याची दळणवळण करू शकतो .
व्यापारी त्यांचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात .
इंधन दरवाढीमुळे राज्यातील एसटी मालवाहतूक महाग होत आहे .
त्याच अनुशंघाने हि नवीन सेवा उपलब्ध केली आहे .
जनरल स्टोअर्स, ऑटोमोबाईल्स, हार्डवेअर, औषधी, तसेच खत शेती माल, अशा अनेक वाहतुकीसाठी महाकार्गोचा उपयोग होत आहे.
हि सेवा स्वातंत्र्य आहे
तात्काळ सुविधा, सुरक्षित वाहतूक, महाराष्ट्रात कोठेही सेवा, अत्यंत माफक दरात,
वेळेवर वितरण, आणि 24 तास सेवा. एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकात माल वाहतुकीसाठी
स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
त्या ठिकाणी जाऊन संबंधित व्यापाऱ्याने ट्रान्सपोर्ट करण्यासाठीचा फॉर्म भरायचा असतो.
त्यानंतरची पुढील सर्व प्रोसेस याच ठिकाणी घेतली केली जाते.
किती भाडे आकारले जाते
महाकार्गो या बस ने 200 किलोमीटरपर्यंत 57 रुपये प्रति किलोमीटर
तर 201 किलोमीटरच्या पुढे 55 रुपये प्रति किलोमीटर दर आहेत.
एकाच व्यापाऱ्याचे परतीचे भाडे मिळत असेल
तर 200 किलोमीटरपर्यंत 56 रुपये व त्यापुढे 54 रुपये प्रति किलोमीटर भाडे आकारले जाते.