dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024

भारतीय पोस्ट ऑफिस सोबत काम करुन कमवा हजारो रुपये पहा कसा कराल अर्ज ( Post Office Franchise Scheme Marathi)

भारतीय पोस्ट ऑफिस सोबत काम करुन कमवा हजारो रुपये पहा कसा कराल अर्ज ( Post Office Franchise Scheme Marathi)

भारतीय पोस्ट ऑफिस सोबत काम करुन कमवा हजारो रुपये पहा कसा कराल अर्ज

भारता मध्ये पाहिले तर तीन लाखांहुन अधिक पोस्ट ऑफिस आहे .
ही कार्यालय भारताच्या काना कोपऱ्यात पोहचली आहेत.
भारतीय पोस्ट चे भारतामध्ये जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क असूनही,
1.55 लाखांहून अधिक टपाल कार्यालये आहेत, ज्यात 89% ग्रामीण भागात आहेत,
तरीही टपाल कार्यालयांची मागणी कायम आहे.
महाराष्ट्र ही या मध्ये मागे नाही .
पोस्ट ऑफिस फक्त पत्र व्यवहार करते असे नाही .
आणखी भरपूर सेवा ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम वर्षांन वर्ष करत आलेले आहे .
तर आपण याच पोस्ट ऑफिस मार्फत कसा पैसा कमवायचा हे या माध्यमातून पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिस काम कसे करते (Post Office Franchise Scheme Marathi)
पोस्ट ऑफिस म्हटलं की आपल्याला आपल्या मामाची पत्र आठवतात
परंतू पोस्ट ऑफिस चे काम तेवढेच राहिलेले नाही आता तुम्ही तुमची कोणतीही वस्तू पोस्ट व्दारे पोहचू शकता.
पोस्ट ऑफिस ने त्यांचा कारभार तर वाढवलाच आहे परंतु त्यांनी नेटवर्क कि खूप मोठे केले आहे .
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कानी काळातच पार्सल पोस्टल सेवा पोहच होत आहे .
त्याच बरोबर त्यानी इतर सेवा हि आपल्या ग्राहकापर्यंत पोहचायचे काम केले आहे .
आता तुम्हाला लागणाऱ्या सर्व सेवा पोस्ट तुम्हाला देत आहे .

या सेवा प्रदान करते पोस्ट ऑफिस (post office schemes in marathi)
1) या व्दारे तुम्ही स्पीड पोस्ट करू शकता
2) मनी ऑर्डर करू शकता
3) सरकारी स्कीम चे ऑनलाईन फॉर्म भरू शकता
4) सर्व प्रकारचे वाहनाची इन्शुरन्स करू शकता
5) या मध्ये तुम्ही जीवन विमा
6) सर्व प्रकारचे तिकिट बुक करू शकता
7) बँक खाते उघडू शकता
8) आधार कार्ड पॅनकार्ड पासपोर्ट ही काढू शकता.
9) गॅस बुकिंग व इतर सरकारी कामे व
या सारख्या अनेक सुविधा तुम्ही तुमच्या गाव पातळी वर लोकांपर्यंत पोहचू शकता.

कशी घ्याल पोस्ट ऑफिस ची फ्रेंचायजी (Post Office Offer in Marathi)
सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या गावचा सर्वे करावा लागेल .म्हणजे जवळ किती ऑफिस आहेत .
तुमच्या व्यवसायावर परिणाम होईल अशे किती व्यवसाय आहेत .
इंटरनेट लाईट या गोष्टी ही तितक्याच महत्वाच्या आहेत.
हे फ्रेंचायजी मॉडेल गेले कित्येक वर्षा पासुन पोस्ट ऑफीस देत आहे.
आता तुम्ही ही या सेवा देण्यासाठी अर्ज करू शकता .
परंतू पोस्ट ऑफिस तर्फे ही तुमच्या जवळील सर्वे केला जाईल ५-६ महिन्यात संपूर्ण आढावा घेतला जाईल.
आणि हे व्हेरिफिकेशन झाल्या नंतरच तुम्हाला फ्रेंचायजी आयडी मिळेल.

अर्ज करण्यासाठी काय आहेत नियम व अटी
या साठी तुमचे शिक्षण किमान १२ झालेले असावे .
तुम्हाला १८ वर्ष पूर्ण झालेली असावीत. पुढे कितीही वय असेल तर हरकत नाही.
तुमच्या कडे स्वतः ची कागदपत्रे असावित जसे की पॅनकार्ड आधारकार्ड ई.
तुमचे किमान एक खाते पोस्ट ऑफिस मध्ये असावे व त्या वरती ५००० रुपये असावेत .
तुमच्याकडे संगणक इंटरनेट लाईट ची सुविधा असावी .

कसा कराल फ्रेंचायजी साठी अर्ज (apply post office franchise in marathi)
फ्रेंचायजी साठी अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पोस्ट ऑफिस नेच पोस्ट ऑफिस ला पाठवायचा आहे .
तुम्ही खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता .
किंवा पोस्ट ऑफिसच्या संकेतस्थळावर जाऊन इतर माहिती घेऊन तिथे डाउनलोड करू शकता .

https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise_2021.pdf

या पद्धतीने होईल तुमची कमाई
फ्रेंचायजी च्या एजेंट पद्धती मध्ये तुम्ही लोकांना पॉलिसी किंवा इतर
पोस्ट ऑफिस चे प्रॉडक्ट कमिशन बेस वर विक्री करू शकता .
किंवा तुम्ही फ्रेंचायजी मॉडेल ने काम केले तर तुम्हला
प्रत्यक स्पीड पोस्ट साठी ५ रुपये कमिशन मिळेल .
मनी ऑर्डर असेल तर ४ ते ५ रुपये मिळेल .
पोस्टलस्टॅम्प साठी ५ रुपये मिळेल .
याच बरोबर तुम्हला बाकीच्या सेवांसाठी ४-५ रुपये कमिशन दिले जाईल .

 

comment / reply_from