या १० ऑनलाईन पद्धतीने कमवा लाखो रुपये मोबाईल व लॅपटॉप च्या माध्येमातून चांगली संधी वाचा सविस्तर Top 10 Business Idea Marathi
या १० ऑनलाईन पद्धतीने कमवा लाखो रुपये (Top 10 Business Idea Work From Home Marathi ) .मोबाईल व लॅपटॉप च्या माध्येमातून चांगली संधी वाचा सविस्तर
ज्या पद्धतीने इंटरनेट चा उपयोग हा व्यवसायिक दृष्टीने वाढत आहे
त्याच प्रमाणात इतर छोटेमोठे व्यवसाय
हि या मार्गातून करता येत आहेत व चांगला पैसा या माध्यमातून कमावला जाऊ शकतो
याचेच काही उदाहरणे आपण पाहणार आहोत .
ऑनलाईन पैशे कमवण्याच्या १० पद्धती ( Types of online Money earning )
1) युट्युब द्वारे कमावू शकता
२) ब्लॉगिंग द्वारे कमावू शकता
३) ऑनलाईन स्टोरी द्वारे कमावू शकता
४) अफिलिएट मार्केटिंग द्वारे कमावू शकता
५) ऑनलाईन इन्शुरन्स एजेंट द्वारे कमावू शकता
६) डेटा एन्ट्री द्वारे कमावू शकता
७) ऑनलाईन क्लासेस द्वारे कमावू शकता
८) स्टॉक मार्केट द्वारे कमावू शकता
९) रेफेरल मार्केटिंग
१०) बॅनर ,इमेजेस डिझाइनींग
1) युट्युब द्वारे पैशे कमवण्याची पद्धत ( How to earn Money From Youtube in Marathi Work From Home)
आज प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन आहे सर्व ठिकाणी इंटरनेट पोहचले आहे
प्रत्येकाकडे स्मार्टफोन मोबाईल आहे .
जे आपण टीव्ही वरती पाहायचो ते आता मोबाईल वरती आले आहे.
तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक विषय निवडून युट्युब वरती तुमचे व्हिडीओ प्रसारित करू शकता .
प्रत्येक व्यक्तीला समाजातील कोणत्याही एका विषयाची आवश्यकता असते .
तुम्ही ती बनून त्यांना मदत करू शकता .काही दिवसात तुमचे व्हिडीओ लोकांना आवडतील .
मग तुम्ही इतर व्यवसायिक मार्केटिंग करून किंवा गुगल जाहिराती पासून पैशे कमाऊ शकता .
युट्युब चॅनल कशे बनवायचे त्या मध्ये काय काय कराचे याचे व्हिडीओ युट्युब वरतीच उपलब्ध आहेत .
त्या मुळे इंटरनेट डेटा सोडता तुम्हाला इथे एक रुपया हि खर्च करण्याची आवश्यकता नाही .
हे हि वाचा : युट्युब द्वारे पैशे कशे कमवावे युट्युब चॅनल कशे तयार करावे पहा संपूर्ण माहिती (Earn Money From youtube in Marathi )
२) ब्लॉगिंग द्वारे कमावू शकता ( How to earn Money From Blog in Marathi Work From Home Online )
जशे कि आपण पहिले युट्युब द्वारे कशे पैशे कमवायचे तीच पद्धत ब्लॉगिंग मध्ये हि आहे .
आता जे काही तुम्ही वाचत आहात हा तो ब्लॉगिंग चाच प्रकार आहे .
ब्लॉगिंग द्वारे पैशे कमवण्यासाठी तुम्हला समाजातील एक विषय निवडायचा आहे .
विषय लोकांना आवडेल असा निवडायचा आहे .विषय निवडल्या नंतर त्या वरती तुम्हाला थोडा अभ्यास करायचा आहे .
तो म्हणजे आर्टिकल कशे बनवायचे कुठे कोणत्या गोष्टी लिहायच्या काय कराचे काय नाही करायचे .
पैशे कमवण्याची पद्धत तीच आहे इथे हि तुम्हाला इतर व्यवसायिक मार्केटिंग करून किंवा गुगल जाहिराती पासून पैशे कमाऊ शकता .
ब्लॉग कसा तयार करायचा त्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याचे व्हिडीओ हि युट्युब वरती दिलेले आहेत .
किंवा तुम्ही आपल्या संकेत स्थळावर हि माहिती घेऊ शकता .
तुम्ही सुरवात हि मोफत मध्ये हि करू शकता गुगल ब्लॉग या संकेत स्थळावर तुंही ब्लॉग तयार करू शकता .
३) ऑनलाईन स्टोरी द्वारे कमाऊ शकता ( How to earn Money From Online Story in Marathi Work From Home Online)
ज्या पद्धतीने ब्लॉगिंग द्वारे पैशे कमाऊ शकता त्याच पद्धतीने तुम्ही ऑनलाईन स्टोरी द्वारे कमावू शकता.
चला तर पाहूया .तुम्हाला यासाठी सुद्धा जे ब्लॉगिंग साठी आवश्यक आहे तेच इथे .
फरक एवढाच आहे कि इथे तुम्हाला छोटे काम करून हळूहळू जास्त पैशे कमवायचे आहेत
.हे सुद्धा सुरवातीला तुम्ही कमी भांडवल गुंतवून चालू करू शकता .
या बद्दल माहिती तुम्हाला आपल्या पेज वर किंवा युट्युब वरती मिळेल .
किंवा तुम्ही गुगल स्टोरी या संकेत स्थळावर जाऊन करू शकता .
४) अफिलिएट मार्केटिंग द्वारे कमावू शकता. ( How to earn Money From Affiliate in Marathi Work From Home Online)
तुम्ही वरील कोणतीही पद्धत या सोबत तुम्ही वापरू शकता किंवा
या मध्ये तुम्हला कोणत्याही कंपनी सोबत एक अफिलिएट खाते बनावे लागते .
जसे कि अमेझॉन फ्लिपकार्ट मेशो या सारख्या वस्तू विकणाऱ्या कंपन्या त्यांच्या कडील प्रॉडक्ट तुम्हला विकायचे आहे किंवा
तुम्ही कोणताही कंपनी चे प्रॉडक्ट मार्केट मधून घेऊन त्याची मार्केटिंग मोफत मध्ये फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम
टेलिग्राम अशे अनेक सोशल मीडिया आहेत .
येथे तुम्ही त्या प्रोडक्ट बद्दल माहिती देऊन ते प्रॉडक्ट वितरित करून चांगले पैशे त्या द्वारे कमाऊ शकता .
त्या बद्दल तुम्हाला जास्त माहिती ची आवश्यकता पडणार नाही .
तुमचा ब्लॉग किंवा युट्युब चॅनल असेल तर तुम्हाला हे आणखी सोपे जाईल .
५) ऑनलाईन इन्शुरन्स एजेंट द्वारे कमावू शकता .( How to earn Money From Insurance agent in Marathi Work From Home Online)
आज काल आपण पाहत आलोय कि सर्वांची जीवनशैली बदलत चाली आहे त्या नुसार लोकांना
आपल्या आरोग्याची हि काळजी घायची आहे .
त्याच पद्धतीने तुम्हला एखाद्या इन्शुरन्स कंपनीचे एजेंट बनायचे आहे .
त्या मध्ये तुम्हला लोकांना सोबत संपर्क करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे इन्शुरन्स
विक्री करायचे आहेत .आज सर्व कंपन्या ऑनलाईन व्यवसाय करतात .
या मध्ये तुम्ही जीवन विमा आरोग्य विमा दु चाकी किंवा मोठे वाहने विमा लोकांना देऊ शकता .
या साठी तुम्ही कोणत्याही कंपनी सोबत करार करून काम करू शकता तेही मोफत .
६) डेटा एन्ट्री द्वारे कमावू शकता.( How to earn Money From Data Entry in Marathi Work From Home Online)
कित्येक कंपन्या डेटा वरती काम करता .डेटा एन्ट्री साठी तुम्हाला
कम्प्युटर चे ज्ञान असणे थोडी टाइपिंग असणे गर्जे चे आहे .या मध्ये तुम्हाला काहीही काम असू शकते .
उदा तुम्हाला एकदा ऍडमिशन फॉर्म भरायचा असू शकतो .
एखादा सर्वे लिहायचा असेल तर तो डेटा एन्ट्री द्वारे करतात .
या मध्ये तुम्हला पेजेस किंवा अक्षरे नुसार कमाई होते .
या साठी वेगवेगळ्या संकेत स्थळावर विनंती अर्ज करू शकता .उदा .Upwork,nokari.com
अशा भरपूर कंपन्या तुम्हला डेटा एन्ट्री चा जॉब मिळून देतात .
७) ऑनलाईन क्लासेस द्वारे कमावू शकता . ( How to earn Money From Online Classes in Marathi Work From Home Online)
तुमच्या कडे एखाद्या गोष्टी चे ज्ञान असेल तर ते तुम्ही लोकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पोहचू शकता
तुम्ही स्वतः चे युट्युब चॅनल तयार करून तिथे तुम्हाला येत असलेल्या विषयावर व्हिडीओ बनून पाठवू शकता .
किंवा भारतात अशा कित्याक स्वंस्थां आहेत ज्या ऑनलाईन शिक्षण देतात .
तुम्ही त्यांच्या सोबत करार करून काम करू शकता .उदा .byju's,Unacademy
या सारख्या कंपन्या सोबत तुम्ही काम करू शकता .
८) स्टॉक मार्केट द्वारे कमावू शकता . ( How to earn Money From Stock Market in Marathi Work From Home Online)
शेअर मार्केट म्हणजे हा एक प्रकारचा बाजारच आहे इथे भरपूर साऱ्या मोठ्या छोट्या कंपन्या आपल्या शेअर ची देवाण घेवाण करतात .
बाजारातील मागणी आणि गरज याचा संपूर्ण हिशोब या ठिकाणी होतो .
तुम्ही या मधून हि चांगला पैसे कमाऊ शकता .
यासाठी तुम्हला गणिती ज्ञान असणे आवश्यक आहे .
तुमचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास असणे आवश्यक आहे .
अभ्यास नसताना शेअर मार्केट मध्ये उतरणे चुकीचे आहे .
येथे तुम्हाला बँक प्रमाणे एक डिमॅट खाते असणे आवश्यक आहे .
या मध्ये तुम्हाला १८ वर्ष पूर्ण पॅन कार्ड आधार कार्ड अशा कागदपत्रांची आवश्यकता आहे .
या मध्ये तुम्ही १०० रुपया पासून गुंतवणूक करू शकता .
शेअर मार्केट चे पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत .हे तुम्हला युट्युब किंवा खाजगी क्लासेस वरती मिळतील .
शेअर बाजार स्टॉक मार्केट म्हणजे काय शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी येथे पहा क्लिक करा
९) रेफेरल मार्केटिंग ( How to earn Money From Referral Link in Marathi Work From Home Online)
आपण पहिले कि सर्व व्यवसाय हे ऑनलाईन होत आहे .
त्याच पद्धतीने प्रत्यकाला आपला व्यवसाय
वाढवायचा आहे ,इतर लोकांपर्यत पोहचवायचा आहे .त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करणे आवश्यक आहे .
रेफेरल मार्केटिंग हा त्यातलाच प्रकार आहे .म्हणजे एखादे अँप किंवा संकेस्थळ तुम्ही तुमच्या मित्रांना पाठून त्यामागे पैशे कमाऊ शकता .
उदा . एखाद्या बँक चे खाते तुम्ही उघडले आहे पण बँक तुम्हला सांगते
तुमच्या मित्राला हि खाते उघडायचे सांगा म्हणजे तुम्हाला ५०० रुपये कमिशन मिळेल .
अशा प्रकारे भरपूर साऱ्या कंपन्या रेफेरल मार्केटिंग करतात .
उदा .upstox,zerodha,ICICI Direct etc
१०) बॅनर ,इमेजेस डिझाइनींग ( How to earn Money From Digital Designing in Marathi Work From Home Online)
कोणताही व्यवसाय वाढवायचा असेल तर त्याची मार्केटिंग होणे आवश्यकता आहे .
आणि मार्केटिंग साठी वेगवेगळे बॅनर डिझाइन आर्टिकल मार्केटिंग साठी छोटे छोटे व्हिडीओ
बनवणे .वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाचे डिझाइन बनवणे
यासाठी तुम्हाला फोटो एडिटिंग व व्हिडीओ एडिटिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे .
तुम्हाला तुमच्या जवळ याचे क्लासेस उपलब्ध होतील किंवा युट्युब हुन सुद्धा तुम्ही शिकू शकता .
तुम्ही तुमचे डिझाइन ऑनलाईन हि विक्री करू शकता .व त्या मधून चांगले पैशे कमाऊ शकता .
उदा .pinterest,canva,Shutterstock