dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024
आयुष्मान कार्ड कशे बनवायचे त्याचे फायदे काय ( Ayushman Bharat Card  Registration)

आयुष्मान कार्ड कशे बनवायचे त्याचे फायदे काय ( Ayushman Bharat Card Registration)

आयुष्मान भारत कार्ड (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - How to Apply PMJAY Ayushman Card )

ही भारत सरकारची एक आरोग्य योजना आहे, ज्याचा उद्देश गरीब आणि दुर्बल कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा पुरवणे आहे. या योजनेद्वारे, लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक आरोग्य विमा कवच मिळते.

भारत सरकार कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी खुश खबर

आता 70 वर्षा अधिक वय असेल तरी काढू शकता आयुष्मान भारत विमा कार्ड भारत सरकार कडून मंजुरी मिळाली आहे.

या विमा कार्ड मार्फत तुम्ही 5 लाखापर्यंत तुम्हाला विमा मिळेल . त्या मध्ये तुम्ही 5 लाखापर्यंत कोणत्याही हॉस्पिटल मध्ये
मुफ्त इलाज करू शकता . त्या मुळे अजाच आपले आयुष्मान कार्ड बनुन घ्या 🙏🏻

आयुष्मान कार्ड कसे बनवायचे? (How to Apply Ayushman Card आयुष्मान भारत कार्ड कैसे निकाले)

  1. ऑनलाइन अर्ज करा:

    • अधिकृत वेबसाइटवर जा: https://beneficiary.nha.gov.in/
    • "Am I Eligible" या पर्यायावर क्लिक करा. Beneficiary हा पर्याय निवडा
    • आपला मोबाइल क्रमांक व आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
    • आपल्या कुटुंबाचा तपशील मिळाल्यास, तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल.
    • सर्व कागदपत्रे तसेच तुमचे उदपन्न हे सर्व गोष्टी चा विचार करून तुम्ही पात्र होतात.
    • तुमची KYC व्यवस्तीत रित्या झालेली पाहिजे म्हणजे तुमचे आधार आयुष्मान कार्ड ला लिंक करा
      मोबाईल नंबर लिंक करा .तुमचे फोटो KYC करा .
  2. अर्ज जमा करा:

    • जर पात्रता मिळाली, तर जवळच्या "आयुष्मान भारत सेंटर" मध्ये जा.
    • आधार कार्ड, ओळखपत्र, आणि कुटुंबाचा तपशील घेऊन अर्ज भरावा लागेल.
  3. वेरिफिकेशन आणि कार्ड प्राप्त करा: (KYC Ayushman Card)

    • अर्ज जमा केल्यानंतर, वेरिफिकेशन प्रक्रिया होईल. यानंतर तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड मिळेल.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड आरोग्य कवच मिळण्यास कोण पात्र नसेल .

ज्यांचे उदपन्न मासिक १० हजारहून अधिक आहे .
ज्यांच्याकडे कडे दोन, तीन किंवा चारचाकी वाहने किंवा इतर कमाई करणायचे साधन असेल .

ज्यांच्याकडे शेती यंत्र म्हणजे ट्रॅक्टर मळणी यंत्र इ आहेत. ज्यांच्याकडे किसान कार्ड ची मर्यादा रु. ५०००० आहेत .अशे लोक या योजने साठी पात्र नसतील .

आयुष्मान कार्डचे फायदे: (Benefits of Ayushman Bharat Card )

  1. मोफत उपचार:

    • योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
    • भारत सरकारने आता १२ सप्टेंबर २०२४  पासून  ७० वर्षा वरील नागरिकांसाठी सुद्धा हि सेवा चालू केली आहे .
  2. कॅशलेस हॉस्पिटल सेवा:

    • तुम्ही जर या योजने साठी पात्र असाल तर रुग्णालयात उपचार घेताना कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. सर्व खर्च योजना कव्हर करते.
  3. रुग्णालयांचा मोठा जाळा:

    • सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये हा विमा लागू आहे.
  4. परिवारासाठी कवच:

    • संपूर्ण कुटुंबाला कवच मिळते. एकाच कुटुंबातील सर्व सदस्य लाभ घेऊ शकतात.
  5. पूर्व-रोगांवरील कवच:

    • आधीच्या कोणत्याही आजारांवरही उपचार उपलब्ध असतात.
  6. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय लाभ:

    • हा विमा भारताच्या कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात लागू आहे.

अधिक माहिती साठी जवळील आरोग्य केंद्र किंवा आयुष्मान भारत सेंटर
CSC सेंटर यांच्या कडून माहिती घ्या .

आयुष्मान कार्ड कशे बनवायचे त्याचे फायदे काय ( Ayushman Bharat Card  Registration)

comment / reply_from

related_post