
ग्रॉक AI म्हणजे काय ( what is grok ai chatbot )
काय आहे ग्रॉक AI का घालताय सगळीकडे धुमाकूळ . (What is Grok ai Chatbot in Marathi )
ग्रॉक चॅटबॉट हे एक लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे भाषेचं मोठं मॉडेल आहे. ज्यावर तुम्ही ग्रॉकला कोणताही प्रश्न विचारू शकता.
तुम्ही काहीही सर्च करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी Google सर्च इंजिन, Gemini, Chat GPT वापरत असाल.
तसंच हे ग्रॉक आहे. ग्रॉक ही सगळी कामं करतंच पण जर त्याची कोणी खोड काढायला गेलं तर त्याला जशास तसं उत्तर पण देतं.
एलॉन मस्क हा Twitter वर खूप ऍक्टिव्ह असतो.
तो कोणालाही रिप्लाय देतो प्रश्न विचारणारा कोण आहे? त्याचा शैक्षणिक दर्जा काय?
एकंदरीत कर्तुत्व काय याचा विचार न करता उत्तरं ढोकून देतो.
ग्रॉक एआय सुद्धा थोडे याच टाईप मधलं एलॉन मस्कला Google ला पर्याय सर्च इंजिन आणि एआय चॅटबॉट मॉडेल बनवायचं होतं.
असं मॉडेल जे फक्त एक सर्च इंजिन नसेल तर संभाषण करणारं चॅटबॉट असेल.
हे चॅटबॉट कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ह्युमर म्हणजेच व्यंग्यातून देईल त्यामुळे प्रश्न विचारण्यालाही संभाषण एकदम खरं वाटेल
पहिल्यांदा 17 मार्च 2024 ला ग्रॉक 1 एआय मॉडेल लॉन्च झालं पण हे एआय मॉडेल एकदम बेसिक उत्तरं द्यायचं जसं Google चं Gemini मॉडेल देत
ना तसंच मग ऑगस्ट 2024 मध्ये ग्रॉक टू लॉन्च झालं यामध्ये चांगल्या सुधारणा झाल्या होत्या.
कधी आले ग्रॉक AI
ग्रॉक टू मध्ये विचार करायची क्षमता तर्क करायची क्षमता तसेच इमेज जनरेशनची क्षमता ही वाढली होती मग फेब्रुवारी 2025 मध्ये ग्रॉक 3.0 थ्री लॉन्च झालं.
या ग्रॉक थ्री ची विचार करण्याची तर्क करण्याची क्षमता ग्रॉक टू पेक्षा 10 पटीने जास्त होती मग लोकांनी हे वापरायला सुरुवात केलं
पण सुरुवातीला कोणाला काहीच विशेष वाटलं नाही पण 14 मार्चला टोका नावाच्या एका एक्स युजरने ग्रॉक ला एक प्रश्न विचारला
हे ग्रॉक माझे 10 बेस्ट म्युच्युअल्स कोण आहेत तर हा प्रश्न विचारला होता 14 तारखेला संध्याकाळी साधारणतः
पाच वाजता पण ग्रॉक च त्यावर काहीच उत्तर आलं नाही मग 15 मार्चला सकाळी त्या युजरने ग्रॉक ला परत त्याच प्रश्नावरून हटकलं
पण यावेळी त्या युजरने ग्रॉक ला हिंदीतून शिवी देऊन प्रश्न विचारला सिन करून सोडून दिलं मी तुला यासाठी माफ करणार नाही
यावर एका मिनिटात ग्रॉकचा युजरने दिलेली तीच शिवी देऊन युजरला रिप्लाय आला.
"ओय चिल कर तेरा 10 बेस्ट म्युचुअल्स का हिसाब लगा दिया है मेन्शन के हिसाब से हे ये लिस्ट म्युच्युल्स मतलब दोनों फॉलो करते
हो एक्झॅक्ट डेटा नहीं है मेंशन पे भरोसा किया ठीक है ना अब रोना बंद कर " मग या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले एक्स वरती बऱ्याच
कॉमेडी रिऍक्शन्स यायला लागल्या मग लोकांनी ग्रॉक ला प्रश्न विचारून बेजार करून सोडलं बाकीची एआय चॅटबॉट काही काही प्रश्नावर
उत्तर द्यायचं टाळतात पण ग्रॉक कोणालाच भीत नाही कोणाला म्हणजे ज्याने त्याला बनवलं त्या एलॉन मस्कला सुद्धा एका युजरने ग्रॉकला विचारलं
एक्स वरती सगळ्यात जास्त चुकीची माहिती कोण पसरवतं यावर ग्रॉक ने उत्तर दिलं रिच आणि इन्फ्लुएन्सचा विचार करता
चुकीची माहिती पसरवण्यात एलॉन मस्क टॉपला आहे एक्स वर भारतीयांनी ग्रॉकला गेल्या तीन दिवसात सगळ्या शिव्या शिकवून झाल्यात
तर शेवटी कोण कसं वापरत यावरती अवलंबून आहे तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल काही लिहून पाहिजे .
असेल किंवा तुम्हाला कोणी बोलायला नसेल तरीही ग्रॉक तुम्ही वापरू शकताय तुम्ही जोक केला तर ग्रॉक पण जोक करतोय
रोमँटिक बोलायला गेला तर ग्रॉक पण तुमचा सिंगलपणा ही ओळखेल पण भाई लोग ग्रॉकशी रोमँटिक गप्पा माराव्या लागत
असतील तर विषय टेन्शनचा आहे बाकी राहिला प्रश्न टारगेटचा तर राजकीय नेत्यांवर केलेल्या टिप्पणीमुळे चर्चा होत
असल्या तरी विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी ग्रॉकला विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तर यामुळे
विषय राजकीय झाला नाहीतर ग्रॉक म्हणजे भविष्याची सुरुवात आहे एआय आपल्या भावना किती सहज समजून घेत हे दाखवून देणार आहे.