यंदा देशात सामान्य मान्सून राहणार स्कायमेट चा अंदाज फेटाळला देशात सरासरी ९६ टक्के पाऊस होईल
स्कायमेट चा अंदाज फेटाळला भारतीय हवामान विभागाने देशात सरासरी ९६ टक्के पाऊस पडेल
स्कायमेट ने दिला होता ९४ टक्के पावसाचा रिपोर्ट (Monsoon News India)
आणखी हि बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस चालूच आहे
काही ठिकाणी विजांच्या कडाक्याच्या तर काही ठिकाणी गारा आणि वारा पाहायला मिळत आहे .
काही दिवसा पूर्वी उपमुख्य मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी
हि EL NINO अल-निनो चे संकट या वर्षी येऊ शकते असा अंदाज मांडला होता .
परंतु भारतीय पृथ्वी हवामान खात्याने हा अंदाज चुकीचा होऊ शकतो असे स्पष्ट केले .
दरम्यान स्कायमेट नुसार एल निनो चे संकट मान्सून वरती आहे परंतु याचा
जास्त परिणाम होणार नाही असे भारतीय हवामान खात्याने सांगितले .
भारतामध्ये सरासरी पेक्षा मध्यम सामान्य स्वरूपाचा पाऊस यंदा पाहायला मिळेल .
जून ते सप्टेंबर सामान्य मान्सून राहील परंतु पाऊस कमी होणार नाही असा अंदाज भारतीय हवामान अंदाज ने स्पष्ट केले आहे .
काय आहे अल-निनो वादळ (EL - NINO cyclone)
अल-निनो वाऱ्याची दिशा बदलण्यात, कमकुवत होण्यात आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या
पाण्याचे तापमान वाढवण्यात विशेष भूमिका बजावते.
अल निनो चा एक परिणाम म्हणजे पावसाचे प्रबळ क्षेत्र बदलतात.
परिणामी, जास्त पाऊस असलेल्या भागात कमी आणि कमी पावसाच्या भागात जास्त पाऊस होतो.
हे हि वाचा पाऊस कसा मोजला जातो पाऊस कसा पडतो पहा सविस्तर माहिती
ज्या वर्षी अल-निनो क्रिया वाढते, त्याचा नक्कीच नैऋत्य मान्सूनवर परिणाम होतो.
त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात भीषण
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एल-निनोमुळे संपूर्ण भारतात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते, तर ला-निनामुळे अतिवृष्टी होते.
भारतात कधी येतो मान्सून
मान्सून चा विषय निघाला कि सगळीकडे कामाला सुरवात होत असते
कारण नवीन पीक घेण्यासाठी शेतकरी तयार होतात परंतु हा मान्सून
आपल्या देशात कधी येतो .तर मान्सून सगळीकडे वेगवेगळ्या वेळेत येतो जसे कि
केरळमध्ये 1 जूनपर्यंत, तळकोकणात 7 जूनपर्यंत आणि
मुंबईत 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतभर मान्सून पसरतो.