dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024

नारळाच्या कचऱ्या पासून सुरु करा हा शेती सोबत व्यवसाय वाचा सविस्तर

नारळाच्या कचऱ्या पासून सुरु करा हा शेती सोबत व्यवसाय वाचा सविस्तर

नारळाच्या कचऱ्या पासून शेती सोबत सुरु करा हा व्यवसाय

शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या व्यवसायाबद्दल बोलणार आहोत तो व्यवसाय
आपल्या महाराष्ट्रा मध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतो .
कारण हा व्यवसाय श्रीलंका तामिळनाडू केरळ आंध्र या ठिकाणी जास्त होतो .
ज्या व्यवसायबद्दल मी बोलत आहे तो म्हणजे कोकोपीट तयार करणे किंवा काथ्या दोरी तयार करणे .
चला तर मग पाहूया या व्यवसायाबद्दल माहिती . (Cocopeat Business in Marathi )

काय आहे का कोकोपीट व्यवसाय
नारळाच्या कचऱ्या पासून तुम्ही हा चांगला व्यवसाय करू शकता .
तुम्ही शहराच्या भरपूर ठिकाणी नारळ विक्री करणारे पहिले असतील
त्यांचे नारळ विक्री करून झाल्यावर ते तिथेच टाकून दिलेले असले .
हा व्यवसाय त्याच टाकलेल्या नारळा पासून सुरु होऊ शकतो ते कसे तर आपण पाहूया .
शेतकरी मित्रानो आपण काथ्या हा खुप दिवसा पासून आपण वापरात आलो आहोत
सर्वात कमी किमतीती मिळणारे एकप्रकरची सोल दावे दोरी म्हणू शकता
किंवा झोपण्यासाठी बाज असेल किंवा आताच्या घडीला नर्सरी मधील रोपांसाठी कोकोपीट असेल .
तर हे सर्व या नारळाच्या कचऱ्या पासून बनवलेले असते .ते तुम्हाला शहराच्या ठिकाणी मोफत हि मिळू शकते .
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला काही मशीनरी हि लागणार आहेत त्याच बरोबर तुम्हाला
काही कामगार हि लागणार आहेत .हा व्यवसाय तुम्ही छोट्या लेवल पासून हि चालू करू शकतात .

कोणताही व्यवसाय करण्याआधी हे करा (Start Cocopeat Business In Maharashtra)
कोणताही व्यवसाय चालू करायचा असल्यास त्या व्यवसाया बद्दल संपूर्ण अभ्यास करणारे आवश्यक आहे .
जसे कि तुम्ही बनवत असलेले प्रोडक्ट बाजारात किती ठिकाणी उपलब्ध आहे
त्याची मागणी किती आहे .किती दिवस त्या प्रॉडक्ट ची आवश्यकता आहे .ते प्रॉडक्ट सिजनेबल आहे का .
त्याच्या दळणवळणाचा खर्च किती आहे .या गोष्टी खूप गर्जेच्या आहेत .
बहुतांश व्यवसाय याच कारणाने बंद पडतात .
त्या मुळे कोणताही व्य्सवाय चालू कराचा असेल तर त्याचा खोलवर अभ्यास करा .

या साठी कोणता कच्चा माल लागतो . 
हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला नारळाच्या सालीची व आतील भागाची गरज आहे .
तुम्ही हे शहरातील नारळ विक्रेतांकडून उपलब्ध करू शकता .
किंवा या साठी एखाद्या नारळ उद्पादक शेतकऱ्याशी बोलून तुम्ही मिळवू शकता .
किंवा कोणाच्या ठिकाणी हा कच्चा माल उपलब्ध होईल .
बाकी तुम्हाला लाईट ची आवश्यकता असेल त्याच बरोबर
१ कुशल कामगार
४ कामगार
तुम्हाला या साठी ४० बाय ४० ची जागा लागू शकते .
३ फेज लाईट
बरोबर तुम्हाला १ ते ४ मशीन लागणार आहेत .

या पासून कोणता माल बनवला जातो
नर्सरी साठी कोकोपीट (coco peat nursery uses)
कोकोपीट ब्लॉक
कोकोपीट ब्रिक्स
काथ्या दोरी
पायपुसणी
आणखी बरेच उद्पादने बनवू शकता .

कुठे विकला जाणार पक्का माल
आज बाजारात तुम्ही नर्सरी चे झाडे पहिली असतील तर त्याचा वाढी साठी
सपोर्ट हा कोकोपीट चा असतो तुम्ही तुमच्या जवळील नर्सरीशी बोलून त्यांना तुमचा माल विक्री करू शकता .
शेतकरी काथ्या भरपूर प्रमाणात वापरतात तो काथ्या तुम्ही दुकानदारांना विक्री साठी देऊ शकता .

महाराष्ट्रा शेती मध्ये हि याचा चांगला उपयोग होतो खत म्हणून हि वापरतात
कोकोपीट आता हायड्रोफोनिक्स शेती मध्ये हि वापरतात
त्या मुळे महाराष्ट्रात याची मागणी वाढताना दिसत आहे

साधारण किती खर्च येऊ शकतो
कोणताही व्यवसाय म्हटलं कि गुंतवणूक अली म्हणजे त्यामध्ये मशीनरी कामगार व इतर खर्च आला .
आता या व्यवसाय साठी तुम्ही कच्चा माल मोफत मध्ये हि उपलब्ध करू शकता .
परंतु तुम्हाला मशीनरी व इतर खर्च येणार आहे .
जवळ पास हा व्यवसाय तुम्ही ४ ते ५ लाख रुपया मध्ये छोट्या स्तरावर करू शकता .
आणि ८ ते १० लाखात मोठ्या स्तरावर .या मध्ये संपूर्ण मशीनरी लागणारे साहित्य मिळू शकते .

या वर मिळेल सरकारी अनुदान
व्यवसाय मोठा असेल तर तुम्ही सरकारी अनुदान हि घेऊ शकता .
सरकारच्या स्कीम व्यवसायाबद्दल चालूच असतात .
तुम्ही त्याबद्दल पडताळणी करून घेऊ शकता .
या व्यवसाया साठी तुम्ही ३५ ते ४० % सरकारी अनुदान मिळवू शकता .

कोकोपीट व्यवसाय चालूकरण्यासाठी मशीनरी मिळण्याचे ठिकाण
इतर माहिती साठी संपर्क
सावंत इंडस्ट्रीज एम आय डी सी लातूर
व्हाट्सअप :- +९१ ८६०३९९९९१४

comment / reply_from

related_post