हवामानात अचानक बदल पुन्हा अवकाळी पावसाचे सावट वाचा सविस्तर
हवामानात अचानक बदल पुन्हा अवकाळी पावसाचे सावट वाचा सविस्तर
आताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले होते .
बहुतांश ठिकाणी नुकसान हि जास्त प्रमाणात झाले होते .
काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी वादळी वारा हीच परिस्तिथी
पुन्हा उभा राहते काय या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .
शेत मधील ज्वारी बाजरी आंबा या सारखे पिके नुकसानीत सापडत आहेत .
आधीच अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळाली नाही तोवरच पुन्हा हे संकट उभारताना दिसत आहे .
आज कोणत्या ठिकाणी पाऊस
एप्रिल व मे महिन्यात सर्वत्र वादळी वारा व थोड्या प्रमाणात अवकाळी पाऊस
पाहायला मिळत असतो परंतु शुक्रवार पासून वातावरणात बद्दल होऊन .
८ एप्रिल रोजी पुणे जिल्ह्या सह अहमदनगर बीड जालना बुलढाणा सातारा या
जिल्ह्यात आज अवकाळी पाऊस झालेला पाहायला मिळाला .
नगर जिल्हात वाऱ्यासह पाऊस झाला शुक्रवारी रात्री हि नेवासा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला .
९ एप्रिल रोजी इथे होणार पाऊस
रविवारी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे .
पुणे परभणी व नांदेड जिल्हात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज दर्शवला आहे .
सातारा सांगली कोल्हापूर ढगाळ वातावरन राहील .
तापमान राहील शांत
येत्या दोन दिवसाला उन्हाचा पारा कमी दिसून येणार आहे ८ एप्रिल रोजी सर्वत्र
३७ से .अ एवढे तापमान नोंदवण्यात आले आहे आणि पुढील २ दिवस हि ते याच
प्रकारे स्थिर राहील .