पाऊस कसा मोजला जातो पाऊस कसा पडतो पहा सविस्तर माहिती ( Paus kasa Mojatat )
पाऊस कसा मोजला जातो (Rain forecast Marathi )
सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे नदीतील पाण्याचे बाष्प होते आणि ते बाष्प हवेच्या साह्याने वरती आकाशामध्ये जाते.
आकाशामध्ये त्या बाष्पाचे ढग बनते आणि त्या ढगाला ज्यावेळेस थंडावा मिळतो
तर त्याचे बर्फात रूपांतर होते. त्याच बर्फाला पुन्हा जेव्हा उष्णता मिळते ते बर्थ वितळते आणि पाऊस पडतो.
ढग अथवा मेघ म्हणजे काय?( Cloud in marathi )
ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे.
वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेल्या ढगातील जलकण,
हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहीत अवस्थेत असतात.
म्हणजेच ते वजनाने अत्यंत हलके असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत असतात.
क्यूमुलो निंबस हा ढगांचा एक प्रकार असून क्यूमुलो म्हणजे उपड्या वाटीसारखा
आणि निंबस म्हणजे पाऊसवादळ होय. म्हणजे एखाद्या ऐरणीसारखा आणि उंचच उंच पसरलेला पाऊस देणारा ढग होय.
वातावरणातील भौतिक क्रिया प्रक्रियांनी विविध प्रकारच्या ढगांची निर्मिती होते.
ढगांची काही रंजक बाबी :- ( Cloud Work in marathi )
सर्वच ढगातून पाऊस पडत नाही.
काही ढग पूर्णता धुराचे अथवा धूलिकणांचे बनलेले असतात.
सर्वच ढग धुरांपासून बनलेले नसतात काहीवेळा धूर एक वातावरणीय घटक म्हणून ढग निर्मितीसाठी मदत करतो.
पाऊस हा मिलीमीटर, सेंटीमीटर मध्ये कसा मोजला जातो?
आपण खुपवेळा वाचलं किंवा पाहिलं असेल कि पाऊस हे
लांबीमध्ये (मिलीमीटर,सेंटिमीटर किंवा इंच) मोजला जातो,
त्यासाठी कुठलंही Calculation (गणना) केलं जात नाही.
त्यामागे कारण असा कि, पावसाच्या थेंबाला ठराविक आकार किंवा वजन नसते
पाऊस कसा मोजला जातो पर्जन्यमापन
पर्जन्यमापनासाठी वापरणाऱ्या उपकरणाला Rainmeter (रेनमीटर) किंवा हाइड्रोमीटर,
यूडोमीटर, प्लवीओमीटर या ओमब्रोमीटर म्हटला जातो.
पावसाचे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरण खालील खालीलप्रमाणे असते,
पाऊस कसा मोजतात पाऊस कसा पडतो
१) एक काचेची नळी किंवा कंटेनर ज्याला ‘Collecting Bottle’ म्हटलं जातो.
ह्या नळीला बाहेरून धातूचा मुलामा चढवलेला असतो.
ह्या नळीमध्ये, पावसाचे जमाझालेले पाणी एकत्रित केला जातो.
२) काचेच्यानळीवर एक नरसाळा लावलेला असतो ज्यामुळे पाणी इकडे-तिकडे जात नाही.
३) ह्या नळीला हलु नये म्हणून सिमेंटच्या आधाराने पावसात उघड्यावर ठेवला जातो.
नळीला कुठल्याही झाडाखाली किंवा शेडखाली खाली ठेवला जात नाही कारण त्याने पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने गोळा होत नाही.
४) रोज ठराविक वेळानंतर ह्या नळीमध्ये जमाझालेलं पावसाचे पाणी एका काचेच्या पात्रात (Beaker) जमा केला जातो.
काचेच्या पात्राला मोजमापन करण्यासाठी मिलीमीटर,
सेंटीमीटर किंवा इंच मध्ये खुणा असतात (जसे पट्टीवर असतात तसे) आणि त्याद्वारे जमाझालेल्या पाण्याची उंची मोजली जाते.
५) आलेली उंची हि त्या ठिकाणाची त्या वेळेत झालेल्या पावसाची मापन असते.
६) ह्यात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची मापं (लांबी लांबी आणि रुंदी) जगात सगळ्याठिकाणी सारखीच ठेवली जाते.
म्हणजेच नळीची लांबी २०३ मिलीमीटर आणि नरसाळ्याची व्यास ५ इंच ठेवली जाते.
७) आजकाल नळी आणि नरसाळा वेगळे वेगळे नसतात,
ते एकत्रितपणे नळीवरच मोजमापीसाठी खुणा केलेल्या असतात.
८) भारतात हवामान विभागाद्वारे पावसाची दिवसातून २ वेळा (सकाळी ८ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता) मोजमापन केला जातो.
९) आलेल्या निरीक्षणांची नोंद वर्षानुवर्षे ठेवली आणि केली जाते.
त्याचा उपयोग त्या भागाचा सरासरी पर्जन्यवृष्टी किती झालं किंवा अंदाज किती होईल ह्याच भाकीत केला जातो.
कृत्रिम पाऊस म्हणजे काय
पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान,
वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात.
यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते.
अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं.
काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे, म्हणजेच कृत्रिम पाऊस.
गारपीट म्हणजे काय (Garpit in Marathi)
हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं.
अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.
बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे
बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे.
ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. ( गारपीट कशी होते )
तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह.
ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर.
ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात.
त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात.
त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते.
ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते.
या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात.
ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे.
ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.
एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात.
ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग.
ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते.
ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात.
हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल,
तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो.