आता घरीच बनवा शुद्ध सोयाबीन व शेंगदाणा तेल आजच हे छोटेशे मशीन घरी घेऊन या वाचा सविस्तर
आता घरीच बनवा शुद्ध सोयाबीन व शेंगदाणा तेल आजच हे छोटेशे मशीन घरी घेऊन या वाचा सविस्तर
आपण रोजच कोणत्याना कोणत्या पदार्थात तेलाचा वापर करतो सकाळी नाष्ट्या पासून
तर रात्रीच्या जेवणा पर्यंत परंतु हे तेल आपल्या साठी किती धोकादायक आहे माहित आहे का .
आपण रोजच्या जीवनात जे तेल खातो त्या मध्ये जास्त प्रमाणात पाम तेल वापरले जाते .
रिफाईंड करण्यासाठी जास्त तापमानात बनवले जाते जास्त प्रमाणात पाम तेल खाण्यात आल्यामुळे आरोग्याला हि धोका निर्माण होतो .
हृदय विकार होतात .(soybean oil machine price )
रिफाईंड ते चा वापर कमी प्रमाणात केला जावा यासाठी भरपूर कंपन्या कचा घाना तेल
बाजारात आणतात पंरतु त्या मध्येही काहींना काही मिश्रीत सापडते .
त्या मुळे हे तेल जर घरीच बनवले तर .हो हे तुम्ही करू शकता थोडा खर्च वाढेल पण निरोगी नक्कीच व्हाल .
बाजारात आता नवीन स्वरूपात तेल घाण्याचा छोट्या मशीन आलेल्या आहेत .
या मशीन द्वारे तुम्ही तुमच्या शेतात येणारा शेंगदाणे सोयाबीन मोहरी किंवा इत्तर तेलयुक्त पदार्थाचा वापर करू शकता .
चला तर मग आज या बद्दल आपण माहिती घेऊ .
बाजारात तेल काढणायचे हे ३ प्रकार आहेत (Make oil at home in marathi)
१) लाकडी घाना तेल
२) कोल्ड प्रेस तेल
३) रिफाईंडरी तेल
१) लाकडी घाना तेल (lakdi ghana tel Oil )
हि प्रथा खूप जुनी आहे या मध्ये पूर्वीचे लोक एक बैल जोडून हा घाना चालवायचे .
आता या लाकडीघाण्यात सुद्धा बद्दल होऊन यामध्ये हि लाईट वर चालणारे घाणे आलेले आहेत .
या घाण्याला सर्व बाजूनी लाकूड वापरलेले असते त्या मध्ये एक मोठा बंब्या मुसळे असतो .
या दोन्ही च्या मध्ये आपले धान्य पडते व तेल बाहेर पडते .या मध्ये तेलाचे प्रमाण कमी प्रमाणात निघते .
सर्व बाजूने लाकूड असल्यामुळे तेल गरम होत नाही त्यामुळे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते .
२) कोल्ड प्रेस तेल (Shengdana oil cold press oil)
भारतात खूप आधी पासून तेलाचा उपयोग केला जातो परंतु आपण फक्त लाकडी घाना तेल खात असे
बाहेरील देशात लाकडी घाना तेल बनवणे खूप महाग जात असे
त्या मुळे त्यांनी अशा आधुनिक पद्धतीचा शोध लावला असावा .
या मध्ये तेल गरम होते परंतु लगेच थंड होण्याची क्रिया या मध्ये होते .
या मध्ये १५० ते १८० तापमानात क्रिया केली जाते .
या मध्ये तुम्हला छोट्या व मोठ्या मशीन बाजारात उपलब्ध आहेत .
३) रिफाईंडरी तेल (refined oil)
सर्व घरांमध्ये हे तेल पहिले जाते गरिबांपासून ते श्रीमंता पर्यंत परंतु हे तेल कशे बनते हे माहित आहे का .
रिफाईंडरी तेल म्हणजे कोणत्याही तेल प्युरिफाय करणे आणि त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणणे .
प्रमाण पेक्षा जास्त पाम तेल मिश्रीत करणे किंवा केमिकली प्रोसेस करणे .
रिफाईंड तेल जास्त प्रमाणात खाले तर तुमचे कोरेस्टोरल वाढते हृदय विकार जास्त प्रमाणात होतात .
आता तुम्हाला समजले असेल कि कोणत्या तेला मुळे काय होते .
तर आपण पाहणार आहोत कि घरीच तेल कशा पद्धतीने बनवता येईल .
तर या साठी बाजारात काही मशीन उपलब्ध झालेल्या आहेत .
काही मशीन मोठ्या तर काही छोट्या त्याच पद्धतीने आपण एका मशीनचे उद्धारार्थ पाहू
बाजारात भरपूर कंपन्या या मशीन बनवतात आता या मध्ये चांगली मशीन शोधायची
म्हणजे आपल्याला आधी ती घेऊन पाहावी लागेल .
पण चिंता करू नका आम्ही तुम्हाला या बद्दल थोडी महिती देऊ इच्छितो.
आपण पाहणार आहोत घरगुती कोल्ड प्रेस ऑइल मशीन बद्दल माहिती (Cold press oil machine)
ताशी १ ते २ लिटर तेल तयार करणारी मशीन (mini oil press machine)
हे मशीन घरी वापरण्यासाठी आहे याची क्षमता हि तशीच आहे
या मशनची किंमत बाजारात २० ते २५ हजार इतकी आहे .
२१० -२३० व्होल्ट डीसी करंट लाईट वर चालणारी हि मशीन आहे .
ते तुम्ही कशाचे तेल बनवता यावर अवलंबून आहे .
या मशीन ची १ वर्षाची कंपनी वॊरंटी आहे .
या मध्ये तुम्हाला १ -२ लिटर प्रति तास या मार्फत तेल काढता येते .
या द्वारे तुम्ही शेंगदाणा तेल ,सोयाबीन तेल ,मोहरी तेल ,खोबरे तेल इ तयार करू शकता .
ताशी ७-८ लिटर तेल तयार करणारी मशीन (large oil press machine )
या मशीन द्वारे तुम्ही तुमचा छोटासा व्यवसाय चालू करू शकता
हा व्यवसाय तुमचा १ लाख भांडवल मध्ये चालू होऊ शकतो
या मशनची किंमत बाजारात ६० ते ६२ हजार इतकी आहे .
पाऊणे दोन एच पी मोटर वरती हि चालते .
तुम्हाला या साठी सिंगल फेज लाईट ची आवश्यकता पडेल .
ते तुम्ही कशाचे तेल बनवता यावर अवलंबून आहे .
या मशीन ची १ वर्षाची वॊरंटी आहे .
या मध्ये तुम्हाला ७-८ लिटर प्रति तास या मार्फत तेल काढता येते .
तुम्ही जर मोठा व्यवसाय करणार असाल तर या व्यतरीक्त आणखी भरपूर प्रमाणात मशीन उपलब्ध आहेत .
एका किलो मध्ये किती तेल निघते
तुम्ही जर रोजच्या तेलाची तुलना या सोबत केली तर तुम्हाला हे परवडणार नाही .
कारण या प्रक्रिये मध्ये तुमचा वेळ आणि खर्च दोन्ही हि वाढतात .
उदारणार्थ पाहूया . (cooking oil Machine )
कोणतेही तेल जर तुम्हाला घरी बनवायचे असेल तर सर्व प्रथम हे लक्षात असुद्या
तुम्ही जर १ किलो शेंगदाणा घेतला तर तुम्हाला त्याच्या ३० ते ३५ टक्के एवढे तेल त्या मधून निघेल
म्हणजे जर तुम्ही १ किलो शेंगदाणा घेतला तर तुम्हाला २५० ते ३०० मिली ली एवढे तेल मिळेल .
म्हणजे तुम्हाला ३ किलो शेंगदाणे मागे ९०० मिली ली म्हणजे बाजारात जो पाऊच मिळतो तो .
परंतु या मधून तुम्हाला रो खाद्य हि मिळते .हे खाद्य तुम्ही पशु खाद्य म्हणून बाजारात विक्री करू शकता बाजारात याची किंमत २५ ते ४० रुपये किलो असते .
तुम्हाला जवळपास सर्व गणित मिळवले तर ५०० ते ६०० रुपये लिटर हे गुणकारी तेल भेटेल.
परंतु भरपूर प्रमाणात शेतकरी हे स्वतः घरी पिकवतात म्हणून त्यांना हे कमी खर्चात हि होऊ शकते .
या उलट जर पहिले तर
तुम्ही १ लिटर शेंगदाणा तेल बाजारातून १५० ते २०० रुपये लिटर मध्ये घेता .
म्हणून तुमचे आणि बाजाराचे गणित येथे बसणार नाही .
परंतु ज्यांना निरोगी राहायचे आहे त्यांच्या साठी घरी बनवलेले तेलच गुणकारी आहे .
मशीन खरेदी साठी काय करावे (oil cold press machine )
तुम्ही जर अशा पद्धतीच्या मशीन च्या शोधात असाल तर तुम्हाला हे बाजारात सहज उपलब्ध आहे .
तुम्हाला संपर्क हवा असल्यास अग्रॉपंच ॲप डाउनलोड करा व मदत बटन वर क्लिक करून तुमचा प्रेश्न आम्हाला पाठवा .
व्यवसाय करणारा असाल तर हे लक्षात असुद्या
कोणताही व्यवसाय सुरु करायच म्हटलं कि त्या प्रॉडक्ट ची बाजारात किती आवश्यकता आहे हे पाहावे
तुमचे स्पर्धक किती आहेत .
भांडवल किती लागेल .
राखीव भांडवल किती लागेल .
जागा किती लागेल .
लाईट किती लागेल .
पाणी किती लागेल
मार्केटिंग कुठे करावे लागेल .
प्रॉडक्ट पॅकेजिंग .
कामगार .
सप्लाय चैन बनवावी लागेल.
या सर्व गोष्टीचा अभ्यास करूनच व्यवसायला सुरवात करावी .