नांगरणी म्हणजे काय नांगरणी कोणत्या वेळेत करावी ? नांगरणी करण्याअगोदर हे नक्की पहा
नांगरणी म्हणजे काय (nagarani meaning in marathi)
प्रत्यक शेतजमीन हि कसल्या नंतर तिच्या वर दुसरे पीक उत्तम यावे .यासाठी आपण नांगरणी करतो .
सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची माती भुसभुशीत करावी लागते आणि
नंबर दोन म्हणजे मातीच्या खालच्या थरातील कोश मारावी लागतात.
उन्हाळा संपल्यानंतर शेतीच्या कामाला वेग येतो. सर्वत्र नांगरणी ला सुरवात होते .
कुणी ट्रॅक्टर ने तर कुणी बैलजोडीने .
जसा उन्हाळा संपत येतो व पावसाळा जवळ येतो, तेव्हा नव्याने शेती करण्याची सुरुवात होते.
तर त्याआधी शेतीची मशागत करणे फार गरजेचे असते, ते म्हणजे शेतीची नांगरणी करणे.
नांगरणी करण्या आधी करा हे काम (nagarani in marathi
सर्वप्रथम शेतातील मोठे दगड जुन्या झाडांची खोडे
काढून टाका .आवश्यकता नसणारे तण गवत जाळून नष्ट करा .
संपूर्ण दगड वेचून दूर टाका म्हणजे ते पुन्हा खोलवर जाणार नाहीत ,
नांगरणी वेळी जमिनीवर मुरमुरे किंवा पक्षांचे खाद्य टाकत चला
याने नांगरणी च्या वेळेस जे जमिनीतल अंडकोष अळ्या व इतर किडे पक्षी खातील .
का होत आहे जमीन ना पीक
कित्येक मोठाले नांगर आले जमिनीत खोलवर लावले मातीची पलटी केली परंतु जमीन भुसभुशीत न होता आणखी ना पीक होत आहे .याचे खूप सारे करणे असू शकतात .वातावरणात होणारे बद्दल
जसे कि जास्त प्रमाण प्रक्रिया केलेली खते औषधे .पण आपण नांगरणी या साठी करतो कि जमिनीतील कोश मारले जावेत,नंतर कोश जर मारले नाही तर कोशांचे रूपांतर अंड्यामध्ये होते आणि अंड्यांचे रूपांतर अळ्यामध्ये होते.नंतरच्या पिकासाठी हे आपल्याला धोकादायक असते.
नांगरणी कोणत्या वेळेस करावी (नांगरणी कशी करावी )
आज काल बहुतांश शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही त्या मुळे ते ट्रॅक्टर ने नांगरणी करतात .
त्यामुळे ट्रॅक्टर जेव्हा उपलब्ध असेल तेव्हाच नांगरणी करू शकतात .
परंतु वेळेचा विचार केला तर तो सकाळी किंवा सायंकाळी असावा .
दुपारी किंवा रात्रीचा नसावा . कारण शेतीची नांगरणी जर रात्री केली असेल तर, जमिनीतील जे खालील कोष वर जमिनीवर येतात ते खाण्यासाठी पक्षी नसतात.
कारण रात्री पक्षी झोपलेले असतात. परंतु ज्यावेळी तुम्ही हेच नांगरणी सकाळी करता तेव्हा हे कोश वरती येतात आणि पक्षी त्या कोषांना खातात.सकाळी नांगरणी करताना तुम्ही पाहिले असेल की बगळ्यांचे थवे तुमच्या नांगरणीच्या मागे फिरतात आणि हे बगळे मातीतील कोश खाण्यासाठीच असतात.
नसावा .
नांगरणी झाल्या नंतर काय करावे ?
नांगरणी नंतर वरती आलेले दगड वेचून दूर ठिकाणी टाका .
छोटी तणे व गवताळ असलेले तणे वेचून दूर ठिकाणी टाका .
शेता मध्ये शेणखत टाका म्हणजे शेणखतामधून पिकास पालाश , नत्र व स्फुरद मिळते. शेणखताचा वापर पोषक अन्नद्रव्य म्हणून केला जातो.
पांढऱ्या मुळींची वाढ होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी राहते.
जमिनीसाठी शेणखताचा वापर मोलाचा आहे. कुजलेले शेणखत किंवा भिजलेले नसावे कुजलेल्या शेणात पिकास हानिकारक असे मर रोग , करपा , सड , बुरशी या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी नसाव्यात याची दक्षता घ्यावी.