पेट्रोल-डिझेल सोबत खाद्य तेल हि होणार स्वस्त आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव खाली आले आहेत
भाजीपाल्यापासून ते अन्नधान्यापर्यंत आणि खाद्य तेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच गोष्टींच्या दरात मोठी वाढ झाली आहे.या वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा मिळेल असा अंदाज बांधला जात आहे
जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव खाली आले आहेत त्या मुळे पुढील काही दिवसा मध्ये तेलाचे भाव कमी होतील अशी अशा आहे .
एकीकडे सोन्याला महागाईची इंगळी डसली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा तोरा उतरला आहे. यावर्षात गेल्या अडीच महिन्यात कच्चा तेलाने जोरात उसळी घेतली नाही. भावात घसरणच सुरु आहे. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना हे वर्ष लक्की ठरलं आहे!
काय झाले आंतरराष्ट्रीय बाजारात
19 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 2.36 टक्के घसरुन 66.74 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 2.32 टक्के घटली. आज हा भाव 72.97 डॉलर प्रति बॅरल आहे. plam oil ४००४ वर ट्रेड करत आहे या किंमतींच्या आधारे भारतीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price) जाहीर करतात. कच्चे तेल फारसे न वधारल्याने पेट्रोल-डिझेलची कपात तर माहिती नाही पण दरवाढ मात्र होणार नाही, हे नक्की.
मागील वर्षी सरकारने उचली ठोस पावले
खाद्य तेलाच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने पाम तेलाचा आधारभूत आयात दर कमी केला आहे. तर दुसरीकडे सोयाबीन तेल आणि चांदीच्या आयात किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्रांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. पाम तेलाच्या आधारभूत आयात किमतीमध्ये कपात करण्यात आल्याने येत्या काळात पाम तेल स्वस्त होऊ शकते, तर सोयाबीन तेल तसेच सोने-चांदी महाग होण्याची शक्यता आहे.
२०२२ मध्ये इंडोनेशियाने निर्यात बंदी उठवली
दरम्यान भारतात पाम तेल स्वस्त होण्याचे आणखी एक कारण म्हणजे इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवरील उठवलेली बंदी हे आहे. इंडोनेशिया हा जगातील प्रमुख पाम तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र इंडोनेशियामध्ये महागाई वाढल्याने महागाईवर नियंत्रण घालण्यासाठी तेथील सरकारने पाम तेल निर्यातीवर बंदी घालती होती. भारत इंडोनेशिमधून मोठ्या प्रमाणात पाम तेल खरेदी करतो. मात्र इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवर बंदी घातल्याने तेलाचा तुटवडा निर्माण झाला होतो. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले. परंतु आता इंडोनेशियाने तेल निर्यातीवरील निर्बंध उठवले आहेत त्यामुळे आता पुरवठा सुरूळीत सुरू झाल्यास पाम तेले आणखी स्वस्त होऊ शकते.
खाद्य तेलाच्या दरावर युद्धाचा परिणाम हि झाला
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे दोन्ही देश खाद्यतेलाचे प्रमुख निर्यातदार देश आहेत. रशिया आणि युक्रेनकडून आपण मोठ्याप्रमाणात सूर्यफुलाच्या तेलाची आयात करतो. मात्र सध्या युद्ध सुरू असल्याने तेलाचा पुरवठा ठप्प आहे. एकीकडे इंडोनेशियाने घातलेल्या निर्यात बंदीमुळे पाम तेलाचा तुटवडा तर दुसरीकडे युक्रेनमधून होणारी सूर्यफुलाच्या तेलाची आवक बंद असल्याने खाद्य तेलाची आवक घटली. मात्र आता इंडोनेशियाने निर्यातीवरील निर्बंध उठवल्याने भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे.