प्रवासात महिलांना मिळाली 50% सूट पण काय आहेत नियम व अटी सविस्तर पहा
अधिवेशनात महिलांसाठी मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची वाट सगळ्या महिला पाहत होत्या, काही ठिकाणी तर घोषणेच्या दुसऱ्याच दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी भांडू लागल्या. आणि अखेर 17 मार्चपासून सवलत देण्याचा सरकारकडून जी आर आला.
राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात आली आहे या योजनेला महिला सन्मान योजनेने संबोधित केले आहे
सवलतीचे नियम व अटी
सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सूट, आता यामध्ये साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयन-आसनी म्हणजे नॉन एसी स्लिपर कोच एसटी बस, आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि एसी बसमध्ये 50 टक्के सवलत 17 मार्चपासून लागू करण्यात आली आहे…
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरताही ही सवलत लागू असणार. महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.
प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येणार. म्हणजे तुमचं तिकीट 10 रुपये असेल तर त्यावर तु्म्हाला 5 रुपये सवलत मिळेल आणि त्यावर 2 रूपये कर म्हणजे तुम्हाला 7 रूपये तिकीट काढावे लागणार.
या सवलतीत तुम्ही राज्यभर कुठेही फिरू शकता.. मग पुणे, मुंबई, सातारा, सांगली, राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरू शकता, मात्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा आहे तो दर द्यावा लागणार…म्हणजे तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू होणार, तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारले जाईल.
आता लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे, शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही, म्हणजे तुम्ही ठाणे ते पनवेल, कल्याण ते ठाणे एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही…
यामध्ये महिला रिझर्वेशन करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही, म्हणजे प्रवास करतानाच तुम्हाला लगे हात तिकीट काढून या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो.. यात महिलांनी पुढच्या तारखांचे आगाऊ आरक्षण केले असेल तर तुम्हाला परतावा मिळणार नाही.
5 ते 12 वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत म्हणजे हाफ तिकीटदर आकारला जाईल.
75 वर्षांवरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक योजना लागू होत असल्यामुळे त्यांना फुकट प्रवास करता येणार. यामध्ये 65 ते 75 वयोगटापर्यंतच्या महिलांना सवलतीचा नियम लागू होणार
विविध सवलती -
रा.प.महामंडळांकडून ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडयात सवलती देण्यात येत आहेत. रा.प. बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना -
अ. क्र. | सवलतींचा तपशील | सवलत अनुज्ञेय बससेवा प्रकार | प्रवासभाडयातील सवलत टक्केवारी | शासन प्रतिपूर्ती |
---|---|---|---|---|
१ | स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत | साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित | १०० | प्रति लाभार्थी रुपये ४०००/- ८००० कि.मी. |
२ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत | साधी, निमआराम, आराम | १०० | प्रति लाभार्थी रुपये ४०००/- ८००० कि.मी. |
३ | अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्दयार्थीनीसाठी | साधी | १०० | |
४ | शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार-शिवशाही (शयनयान) बस ८००० कि.मी.पर्यंत | साधी, निमआराम, शिवशाही ( आसनी व शयनयान) |
१०० | |
५ | राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक | साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान) |
५० | ४००० कि.मी.पर्यंत एकत्रीत(साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान) |
६ | राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक | साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान) |
१०० | -- |
७ | विद्यार्थी मासिक पास सवलत | साधी | ६६.६७ | |
८ | विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलत | साधी | ५० | |
९ | विद्यार्थ्यांना मोठया सुटृीत मुळ गावी येणे जाणे, परिक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या/येण्या साठीची सवलत | साधी | ५० | |
१० | अंध व अंपग व्यक्ती | साधी, निमआराम | ७५ | |
शिवशाही (आसनी) | ७० | |||
११ | ६५ % वरील अंध व अंपग व्यक्ती तसेच त्यांचे मदतनीस | साधी, निमआराम | ५० | |
शिवशाही (आसनी) | ४५ | |||
१२ | क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी | साधी | ७५ | प्रति प्रवास ५० कि.मी. |
१३ | कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी | साधी | ७५ | प्रति प्रवास १५०० कि.मी. |
१४ | कृष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी | साधी | ७५ | प्रति प्रवास ५० कि.मी. |
१५ | राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी | साधी | ३३.३३ | |
१६ | विद्यार्थी जेवणाचे डबे | साधी | १०० | |
१७ | अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू | साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित | १०० | रुपये २००० पर्यंत |
१८ | आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत | साधी, निमआराम, आराम | १०० | रुपये १००० पर्यंत |
१९ | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत | साधी, निमआराम, आराम | १०० | रुपये ४०००/- / ८००० कि.मी.पर्यंत |
२० | पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास सवलत | साधी, निमआराम | १०० | रुपये १३४७०/-पर्यंत |
२१ | विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत | साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान) |
१०० | |
२२ | माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत | साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान) |
१०० | |
२३ | रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता | साधी | ६६.६७ | |
२४ | मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्टया अपंग विद्दयार्थ्यांच्या सहलीसाठी | साधी | ६६.६७ | |
२५ | अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे साथीदार | साधी, निमआराम | १०० | रुपये ११०००/-पर्यंत |
२६ | सिकलसेल रुग्ण | साधी, निमआराम | १०० | प्रति प्रवास १५० कि.मी.पर्यंत |
दुर्घर आजार (HIV)रुग्ण | साधी, निमआराम | १०० | प्रति प्रवास ५० कि.मी.पर्यंत | |
डायलेसिस रुग्ण | साधी, निमआराम | १०० | प्रति प्रवास १००कि.मी.पर्यंत | |
हिमोफेलिया रुग्ण | साधी, निमआराम | १०० | प्रति प्रवास १५० कि.मी.पर्यंत | |
२७ | राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती | साधी, निमआराम,आराम | १०० | रुपये २०००/- १००० कि.मी.पर्यंत |
२८ | कौशल्य सेतू अभियान योजने अंतर्गत लाभार्थी ६ महिने पर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमा करिता | साधी | ६६.६७ | |
२९ | शैक्षणिक खेळ | साधी | ५० | |
३० | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना | साधी, निमआराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान) | १०० |