
नांगरणी म्हणजे काय नांगरणी कोणत्या वेळेत करावी ? नांगरणी करण्याअगोदर हे नक्की पहा
नांगरणी म्हणजे काय (nagarani meaning in marathi)
प्रत्यक शेतजमीन हि कसल्या नंतर तिच्या वर दुसरे पीक उत्तम यावे .यासाठी आपण नांगरणी करतो .
सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची माती भुसभुशीत करावी लागते आणि
नंबर दोन म्हणजे मातीच्या खालच्या थरातील कोश मारावी लागतात.
उन्हाळा संपल्यानंतर शेतीच्या कामाला वेग येतो. सर्वत्र नांगरणी ला सुरवात होते .
कुणी ट्रॅक्टर ने तर कुणी बैलजोडीने .
जसा उन्हाळा संपत येतो व पावसाळा जवळ येतो, तेव्हा नव्याने शेती करण्याची सुरुवात होते.
तर त्याआधी शेतीची मशागत करणे फार गरजेचे असते, ते म्हणजे शेतीची नांगरणी करणे.
नांगरणी हा शेतीतील एक महत्त्वाचा प्रक्रिया आहे, ज्यामध्ये माती उलथवून सैल केली जाते. यासाठी नांगर, ट्रॅक्टर किंवा बैलजोडी यांसारखी साधने वापरली जातात. नांगरणीमुळे जमिनीत हवा खेळती राहते, तण नष्ट होतात आणि पीक चांगल्या प्रकारे वाढते.
नांगरणी करण्या आधी करा हे काम (nagarani in marathi
सर्वप्रथम शेतातील मोठे दगड जुन्या झाडांची खोडे
काढून टाका .आवश्यकता नसणारे तण गवत जाळून नष्ट करा .
संपूर्ण दगड वेचून दूर टाका म्हणजे ते पुन्हा खोलवर जाणार नाहीत ,
नांगरणी वेळी जमिनीवर मुरमुरे किंवा पक्षांचे खाद्य टाकत चला
याने नांगरणी च्या वेळेस जे जमिनीतल अंडकोष अळ्या व इतर किडे पक्षी खातील .
का होत आहे जमीन ना पीक
कित्येक मोठाले नांगर आले जमिनीत खोलवर लावले मातीची पलटी केली परंतु जमीन भुसभुशीत न होता आणखी ना पीक होत आहे .याचे खूप सारे करणे असू शकतात .वातावरणात होणारे बद्दल
जसे कि जास्त प्रमाण प्रक्रिया केलेली खते औषधे .पण आपण नांगरणी या साठी करतो कि जमिनीतील कोश मारले जावेत,नंतर कोश जर मारले नाही तर कोशांचे रूपांतर अंड्यामध्ये होते आणि अंड्यांचे रूपांतर अळ्यामध्ये होते.नंतरच्या पिकासाठी हे आपल्याला धोकादायक असते.
नांगरणी कोणत्या वेळेस करावी (नांगरणी कशी करावी )
आज काल बहुतांश शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही त्या मुळे ते ट्रॅक्टर ने नांगरणी करतात .
त्यामुळे ट्रॅक्टर जेव्हा उपलब्ध असेल तेव्हाच नांगरणी करू शकतात .
परंतु वेळेचा विचार केला तर तो सकाळी किंवा सायंकाळी असावा .
दुपारी किंवा रात्रीचा नसावा . कारण शेतीची नांगरणी जर रात्री केली असेल तर, जमिनीतील जे खालील कोष वर जमिनीवर येतात ते खाण्यासाठी पक्षी नसतात.
कारण रात्री पक्षी झोपलेले असतात. परंतु ज्यावेळी तुम्ही हेच नांगरणी सकाळी करता तेव्हा हे कोश वरती येतात आणि पक्षी त्या कोषांना खातात.सकाळी नांगरणी करताना तुम्ही पाहिले असेल की बगळ्यांचे थवे तुमच्या नांगरणीच्या मागे फिरतात आणि हे बगळे मातीतील कोश खाण्यासाठीच असतात.
नसावा .
नांगरणी झाल्या नंतर काय करावे ?
नांगरणी नंतर वरती आलेले दगड वेचून दूर ठिकाणी टाका .
छोटी तणे व गवताळ असलेले तणे वेचून दूर ठिकाणी टाका .
शेता मध्ये शेणखत टाका म्हणजे शेणखतामधून पिकास पालाश , नत्र व स्फुरद मिळते. शेणखताचा वापर पोषक अन्नद्रव्य म्हणून केला जातो.
पांढऱ्या मुळींची वाढ होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी राहते.
जमिनीसाठी शेणखताचा वापर मोलाचा आहे. कुजलेले शेणखत किंवा भिजलेले नसावे कुजलेल्या शेणात पिकास हानिकारक असे मर रोग , करपा , सड , बुरशी या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी नसाव्यात याची दक्षता घ्यावी.
नांगरणीचे उपयोग
- माती सैल होते: जमिनीत हवेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मुळांना चांगले पोषण मिळते.
- तण नियंत्रित होते: नांगरणीमुळे तण नष्ट होतात, त्यामुळे पीक निरोगी राहते.
- पाण्याचा मुरण्याचा वेग सुधारतो: नांगरलेल्या जमिनीत पाणी अधिक चांगल्या प्रकारे मुरते.
- सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात: मातीमध्ये पालापाचोळा आणि शेणखत व्यवस्थित मिसळले जातात, त्यामुळे सुपीकता वाढते.
- मुळांना अधिक जागा मिळते: पिकांच्या मुळांना अधिक चांगली वाढ होण्यास मदत होते.
- जमिनीतील कीड कमी होते: काही किडी आणि त्यांच्या अळ्या सूर्यप्रकाशामुळे मरतात.
नांगरणीचे प्रकार
- गव्हाणी नांगरणी: जमिनीत खोलवर नांगरणी केली जाते.
- उथळी नांगरणी: जमिनीच्या वरील थरावर हलकी नांगरणी केली जाते.
- हिरवळीची नांगरणी: जमिनीत हिरवळ मिसळून सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी केली जाते.
1. नांगरणीची योग्य वेळ निवडा:
- जमिनीत पुरेसा ओलावा असावा, म्हणजेच जमीन फार कोरडी किंवा फार ओलसर नसावी.
- खरिपासाठी उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये खोल नांगरणी करावी.
- रब्बी हंगामासाठी पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हलकी नांगरणी करावी.
2. योग्य अवजारे वापरा:
- कोल्ट नांगर – खोल नांगरणीसाठी वापरला जातो, जमिनीत साठलेले कचरा आणि गवत उपटण्यास मदत करतो.
- देशी नांगर किंवा डिस्क हॅरो – वरचा थर समतल करून जमिनीला चांगली भुसभुशीत बनवतो.
- रोटाव्हेटर – ढेकळे फुटण्यासाठी आणि जमिनीत चांगले मिश्रण करण्यासाठी उपयोगी.
3. नांगरणी करताना हे लक्षात ठेवा:
✅ सुरुवातीस खोल नांगरणी (15-20 से.मी.) – जमिनीतील किड, तण आणि अतिरेकी गवत नष्ट होते.
✅ दुसऱ्यांदा हलकी नांगरणी – जमिनीला समतल करून बियाण्यास योग्य बनवते.
✅ सेंद्रिय खत मिसळा – शेणखत, कंपोस्ट खत नांगरणीपूर्वी मिसळल्यास जमिनीची सुपीकता वाढते.
✅ मातीची परतफेड योग्य प्रकारे करावी – म्हणजेच नांगरणी करताना माती एकाच बाजूला सारू नये.
✅ शेवटी पाटा फिरवा – जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी पाटा किंवा रोलर वापरावा.
4. नांगरणीनंतर काय करावे?
- हरभरा, गहू, सोयाबीन यासाठी खोल नांगरणी आवश्यक आहे.
- तण नियंत्रणासाठी नांगरणीनंतर 8-10 दिवस उन्हात मोकळी ठेवावी.
- जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीचे खत किंवा शेणखत मिसळावे.
- बियाण्याच्या टोकणीपूर्वी हलकी नांगरणी करून समतल करावे.
फायदे:
✔️ जमिनीची निचरा क्षमता सुधारते.
✔️ मातीतील सूक्ष्मजीवसंख्या वाढते आणि सुपीकता टिकून राहते.
✔️ तण नियंत्रण चांगल्या प्रकारे होते.
✔️ पीक चांगल्या प्रकारे रुजते आणि उत्पादन वाढते.
