
कापूस बाजारभाव आले आणखी खाली पहा देशात कुठे किती मिळतोय बाजारभाव वाचा सविस्तर
गेल्या दोन महिन्यात पुन्हा नीचांकीत २००० ने खाली आले आहेत
गेल्या काही महिन्यांत कापसाचे दर जवळपास 2 हजार रुपयांनी घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी 3 ते 4 महिन्यांपासून घरात साठवलेला कापूस विकून टाकला आहे. तर अद्याप काही शेतकरी कापसाचे दर पुन्हा वाढतील या अपेक्षेनं कापूस घरातच ठेवून आहेत.
पण, कापसाचे दर का आणि किती रुपयांनी पडलेत आणि पुढच्या काही दिवसांत कापसाचे दर वाढतील का? या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
कापूस पिकाचा विचार केल्यास गेल्यावर्षी 16 ते 23 मार्च या आठवड्यात कापसाला प्रती क्विंटल 9 हजार 355 रुपये इतका दर मिळाला होता.
यंदा म्हणजे 2023 च्या 16 ते 23 मार्च या आठवड्यात कापसाला प्रती क्विंटल 7 हजार 466 इतका दर मिळत आहे.
याचा अर्थ गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी कापसाला 1,889 रुपये कमी दर मिळत आहे
कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण
गेल्यावर्षी कापसाला काही ठिकाणी 11 हजारांहून अधिक दर मिळाल्याचं समोर आलं होतं.
त्यामुळे मग कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून कापूस घरातच साठवून ठेवला होता.
पुढच्या काळात कापसाला गतवर्षीसारखा दर मिळेल, अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती.
पण, आता 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कापसाच्या दरामधील घसरण कायम आहे.
गेल्या 5 महिन्यांमध्ये कापलासा प्रती क्विंटल मिळालेला सरासरी दर -
नोव्हेंबर 2022– 8,461 रुपये प्रती क्विंटल
डिसेंबर 2022- 8,017 रुपये प्रती क्विंटल
जानेवारी 2023- 8,005 रुपये प्रती क्विंटल
फेब्रुवारी 2023 - 7,815 रुपये प्रती क्विंटल
मार्च 2023 - 7,580 रुपये प्रती क्विंटल
सध्या देशात कापूस बाजारभाव कुठे कशे
भारतीय कापूस निगम कडे इतक्या गाठी
२४ मार्च पर्यंत सरकारी कापूस ठेव हि
190.२४ बेल इतकी आहे
वायदे बाजार २८ एप्रिल
61040.00
पर कँडी
महाराष्ट्र
२५ मार्च मनवत
कमीत कमी दर 7500
जास्तीत जास्त दर 7785
सर्वसाधारण दर 7700
गुजरात
२५ मार्च राजकोट
कमीत कमी दर 6250
जास्तीत जास्त दर 8025
सर्वसाधारण दर 7800
तेलंगणा
२५ मार्च आदिलाबाद
कमीत कमी दर 6442
जास्तीत जास्त दर 7320
सर्वसाधारण दर 7320
कोणतेही बाजारभाव ज्यात्या बाजारसमिती ची आवक व गुणवत्ता पाहून ठरवले जातात
दाखवलेले बाजारभाव हे बाजारसमितीने शेवटचे उपडेट केलेले असतात त्या मुळे येणारे बाजारभाव एक दिवस मागे असू शकतात
