भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत ( Bailgada Sharyat ) चक्क थार गाडी मिळणार बक्षीस पहा सविस्तर
चक्क थार गाडी मिळणार बक्षीस सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पहा सविस्तर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फौंडेशन आयोजित
भारतातील सर्वात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यत हि 9 एप्रिल रोजी विटाजवळील भाळवणीमध्ये होणार आहे.
या बैलगाडी शर्यतीसाठी आतापर्यंत शर्यतीसाठी कधीही न देण्यात आलेली भव्य अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
हे मिळणार चषक (चंद्रहार पाटील बैलगाडा शर्यत)
पहिला क्रमांकाच्या विजेत्यास 19 लाखांची नवी कोरी महिंद्रा थार गाडी देण्यात येणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास मोठे ट्रॅक्टर
तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास छोटे ट्रॅक्टर
चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यास मोटारसायकल
आणि चषक असून हि रोख रक्कम मिळणार आहे (Bailgada Sharyat Chandrahar Patil Sangali )
बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी बक्षीस असल्याने या बैलगाडी
शर्यतीमध्ये सुमारे 200 हून अधिक बैलगाडी शर्यत चालक सहभागी होतील,
असा अंदाज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या शर्यतीच्या निमित्ताने रक्तदानाचा सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आला आहे.
प्रत्येक बैलगाडी मागे ६ जणांनी रक्त दान करणे आवश्यक आहे
आयोजकाने सांगितले आहे कि जे बैलगाडी शर्यतीत भाग घेतील त्या प्रत्येक गाडी सोबत ६ जणांनी रक्त दान करणे आवश्यक आहे .
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सुद्धा टी-शर्ट टोपी याबरोबर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सहभागी प्रत्येक बैलगाडीला एक चषक देण्यात येणार आहे व काही रोख बक्षिसहे.(Chandrahar Patil Sangali )
ही बैलगाडी शर्यती देशातील सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील,
प्रांतातील लोक सहभागी होऊ शकतात अशी माहिती देण्यात आली आहे.
सहभाग घेण्यासाठी संपर्क करून नियम अटी कळवण्यात येतील .