dark_mode
Image
  • Monday, 23 December 2024

काय आहे ऑनलाईन पार्टटाइम जॉब ची फसवणूक कशे लुटले जाताय लाखो रुपये Online Job Scams Marathi

काय आहे ऑनलाईन पार्टटाइम जॉब ची फसवणूक कशे लुटले जाताय लाखो रुपये Online Job Scams Marathi

काय आहे ऑनलाईन पार्टटाइम जॉब चा झोल लुटले जाताय लाखो रुपये

सध्या आपण पाहत आलो आहोत कि ऑनलाईन फसवणुकीचे केसेस वाढत चाल्या आहेत .
लोकांना माहिती असून हि काही लोक कुठे ना कुठे गुंतवणूक करतात आणि फसले जातात .
याच होणाऱ्या फसवणुकीवर हा लेख आहे .तो सविस्तर वाचा आणि या पासून सावध राहा.

कश्या पद्धतीने होते सुरवात  (online job scams marathi)
नमस्कार हि सुरवात होते तुमच्या व्हाट्सअप किंवा इतर सोशिअल मीडिया अँप च्या मध्येमातून
सुरवातीला तुम्हाला एक संदेश येतो .
उदा .Hi is there rohit
तुमचे नाव घेऊन बोल्या मुळे तुम्हाला वाटते कि तुमच्या ओळखीचे कुणी असेल .त्या नंबर वरती एका मुलीचा फोटो असेल .
जसे कि एखादी मॅनेजर मग तुम्हाला ती तुमचे वय विचारते किंवा कोणताही प्रेश्न.
मग तुम्हाला ती ऑनलाईन जॉब बद्दल माहिती देते .
तुम्हाला काही टास्क दिले जातात जशे कि युट्युब चॅनल सबब्स्क्रिब करा .
व केलेला स्क्रिनशॉट पाठवा .
अशे तुम्हला तीन वेळा टास्क दिला जातो .आणि नंतर तुम्ही हे काम पूर्ण केलं म्हणून तुम्हाला तुमच्या कामाचे पैशे पाठवले जातात .

आता तुम्ही खुश होतो आणि पुन्हा पुढे काय काम मिळेल याची उचूकता लागलेली असते
खरी सुरवात येथून होते .
आता तुम्हाला एका टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील केले जाते .तिथे आधी पासून लोक काम करत असतात .
तुम्ही ग्रुप मध्ये गेलात कि तिथे दुसरे लोक आपल्या कामाचा स्क्रिनशॉट टाकतात .
तुम्हाला हे सर्व खर असल्या सारख वाटत.काही काळ निघून गेला कि तुम्हाला मर्चंट टास्क दिला जातॊ .
म्हणजे या मध्ये तुम्हाला लालच दिली जाते .
सांगितलं जात कि १००० चे १३०० लगेच मिळवा.
तुम्हाला एक UPI ID देतात व त्यावर पैशे पाठवण्यासाठी सांगतात
व हे पैशे लगेच तुमच्या खात्यात जमा होतील असं हि सांगितल जात .
आता ग्रुप मधील इतर लोक पैशे पाठवायला सुरवात करतात कुणी १००० तर कुणी १००००
पुन्हा तेच लोक पैशे परत मिळाले आणि वाढून मिळाले याचे स्क्रिनशॉट टाकतात .
आता तुम्ही जर हा टास्क पूर्ण केला तर तुम्हाला ५० रुपये टास्क प्रमाणे आणि एक्सट्रा पैशे मिळणार असतात .
त्यामुळे इथे तुम्हाला कमीत कमी १००० रुपये पाठवायचे असतात .
तुम्ही ते हजार पाठवले कि तुम्हाला पुन्हा १३०० मिळतात किंवा एकदा पैशे मिळाले कि तिथेच ब्लॉक करतात .
आता तुम्हाला जास्त विश्वास बसायला सुरवात होते .
ते तुम्हाला दिवस भर टास्क देतात व तुमच्या वर लक्ष ठेवतात .
पण तुम्ही जर टास्क पूर्ण करून पुढे गेलात तर

या पासून तुम्ही कशे सुरक्षित व्हाल ( job scam marathi information)
<> सोशिअल मीडिया द्वारे येणाऱ्या पैशाच्या मागणी किंवा नोकरी साठी येणारया लिंक वर क्लिक करू नका .
कोणतीही लालची ऑफर असेल तर ती आधी दुसऱ्या संकेत स्थळाहून चेक करा मगच तिची प्रोसेस पूर्ण करा .

<> जर कोणताही कंपनी तुम्हाला मार्केट रेटपेक्षा जास्त परतावा ऑफर देत असेल किंवा त्यात तुम्हाला
काही शंका दिसत असेल तर तुम्ही थोडे सतर्क राहणे आवश्यक आहे.
यामध्ये काही ना काही फसवणूक होण्याची शक्यता आहे.

<> जर कंपनीबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसेल, तर ती देखील एकदा तपासा.
यासाठी तुम्ही सोशल मीडियावर, कंपनीच्या साइटवर किंवा इतर
कोणत्याही सर्च इंजिनवर कंपनीबद्दल माहिती मिळवता.
किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींना विचारा

<> कंपनी बद्दल इतर माहिती तुम्ही वेगवेगळ्या संकेतस्थळावर पाहू शकता
तिथे काही लोकांनी त्यांची मते मांडलेली असतात ते तुम्हाला योग्य माहिती देऊ शकतात.
यासाठी वेगवेगळ्या सर्च इंजिनवर जा आणि लोकांनी दिलेले रिव्ह्यू पहा.
जर रिव्ह्यूची संख्या खूप कमी असेल किंवा फक्त चार-पाच लोकांनी कंपनीबद्दल लिहिले असेल तर ती फसवणूक साइट असू शकते.

<> जर तुमची नोकरीसाठी निवड झाली असेल तर याचा अर्थ तुम्हाला
कामाच्या बदल्यात पगार म्हणून पैसे दिले जातील.
पण जर नियोक्त्याने तुम्हाला कंपनीत सामील होण्यासाठी पैसे मागितले तर लगेच परत जा.
कारण तुमच्यासारखे आणखी काही लोक असतील ज्यांच्याकडून
पैसे मागून हा प्रकार केला जात असेल.या मध्ये सुद्धा तुमची फसवणूक होऊ शकते .

<> कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर आधी संपूर्ण माहिती घ्या .त्यांचे कागदपत्रे तपासा .
ज्या खात्या मध्ये तुमची पैशाची देवाण घेवाण कमी असेल तेच खाते माहिती त्यांना द्या .

कुठे कराल तक्रार
तुमच्या सोबत जर कोणतीही ऑनलाईन धोकाधडी झाली तर कुठे तक्रार कराल .
तुम्ही राष्ट्रीय सायबर अपराध या सरकारी पोर्टल वर करू शकता .
याचे संकेतस्थळ आहे :- https://cybercrime.gov.in/

comment / reply_from

related_post